Home Vidarbha सालई (माहुली) येथे वाघाने दुधाळू गायीला केले ठार… — वाघाला पकडण्यास...

सालई (माहुली) येथे वाघाने दुधाळू गायीला केले ठार… — वाघाला पकडण्यास पाच महिण्यापासून प्रयत्न फेल… — लोकामध्ये नाराजीचे सुर…

   कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी :- पारशिवनी वनपरिक्षेत्र हद्दीतील मौजा सालई(माहूली) शिवारात शनिवारी १४ जून रोजी दुपारी १ वाजता वाघाने दुधाळू गायीवर हल्ला करून ठार केले.

    दामोधर येवले राहणार सालई(मा) ता.पारशिवनी असे पशुपालक शेतकऱ्याचे नाव आहे.

      मिळालेल्या माहिती नुसार हकिकत अशी आहे या लगत मौजा आमगाव शिवारात पाच महिन्यापुर्वी वाघाच्या हल्ल्यात मानवी बळी गेला होता. तेव्हापासून त्या वाघाला पकडण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, ड्रोनच्या मदतीने लोकेशन तपासणे असे वन विभागाकडून पाच महिण्यापासून नाना तर्हेचे सापळे रचून प्रयत्न सुरू आहे. मात्र वाघ वनविभागाच्या हाती न लागता ३१ मे २०२५ रोजी मौजा नवेगावखैरी शिवारात नेऊरवाडा येथील एका शेतकऱ्याचा बळी घेतला तर पाळीव प्राण्यांचे बळी घेण्याची साखळी सुरुच आहे.तीच साखळी सुरू ठेवत शनिवारी मौजा सालई (माहूली) शिवारात शेतीच्या बांधावर दुधाळू गाय चरत असतांना वाघाने हल्ला करुन शिकार केली.

      १५ दिवसाअगोदरच कालवडला जन्म दिला. त्यामुळे कालवड दुधावर असल्याने वासराचा जीव सुद्धा धोक्यात आले आहे. माहिती वनविभागाला दिली असता वन दल घटनास्थळी दाखल झाले. व वाघाला पकडण्यासाठी सापळा रचला आहे. हा वाघ खूप हुशार आहे की, वन विभाग निष्काळजीपणा वागवतो की, पकडण्याचे ढोंग सुरू आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे व पाळीव प्राण्यांचे एकामागे एक बळी घेतले जात आहेत. लोकांमध्ये वन विभागा वर न नाराजी चे सुर आहे असा सवाल क्षेत्रातील शेतकरी व नागरिक करीत आहेत.

      दुधाळ गायीची किंमत १ लाख रुपये असल्याचे बोलले जात आहे. गाय व वासरू याची नुकसान भरपाई वनविभागाने द्यावी अशी मागणी शेतकरी दामोधर येवले,माजी सरपंच भुजंग ठाकरे व इतरांनी केली.