प्रदीप रामटेके
मुख्य संपादक..
विवाह म्हणजे अनेक विचारातंर्गत सुखी व समाधानी संसाराचे दृढ ऋणानुबंध!,या ऋणानुबंधात अडकतांना बऱ्याच विचारांचा आणि अनेक समस्यांचा ताळमेळ करावा लागतोय…
ज्यांचे विचार योग्य असतात ते निर्मळ मनाने व उत्तम ध्येयाने योग्य निर्णय घेतात.अशाच पध्दती अंतर्गत कुमार प्रतीक नितीन भैसारे व कुमारी प्रिया प्रभाकर बारेकर यांनी पती-पत्नी बनण्याचा योग्य व उत्तम निर्णय घेतलाय.या निर्णयाला अनुसरून ते काल विवाह बंधनात अडकले आणि पतीपत्नी झाले…
प्रतीक हा चंद्रपूर जिल्हातंर्गत मौजा नेरी,ता.चिमूर येथील रहिवासी आहे तर प्रिया प्रभाकर बारेकर ही राहणार निमढेला,पो.चारगाव,तालुका वरोरा,जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी आहे.
प्रतीक आणि प्रिया चंद्रपूरला शिक्षण घेत असताना दोघांची मैत्री घट्ट झाली.पण,हि मैत्री शिक्षणाचा उद्देश पुर्ण करण्यासाठी होती.
मात्र,चुकीच्या माहिती अंतर्गत प्रियाला कालांतराने अकारण भयंकर त्रास दिला गेला.यामुळे तिने प्रतीक ला जिवनसाथी बनविण्याचा ठामपणे निर्णय घेतला आणि दिड वर्षांपूर्वी वडीलांच्या घराबाहेर पडली.
प्रिया ने स्वतःच्या आणि प्रतीक च्या सुरक्षेसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रपूर,उपविभागीय पोलिस अधिकारी चिमूर,ठाणेदार शेगाव (बु.) येथे मेलवर तात्काळ तक्रार दाखल केली.याचबरोबर त्यांना रजिस्टर पोस्टल द्वारे लेखी तक्रार दाखल केली.
या तक्रारीला अनुसरून कुमारी प्रिया प्रभाकर बारेकर यांनी चंद्रपूर जिल्हातंर्गत वरोरा तालुक्यातील पोलिस स्टेशन शेगाव (बु.) येथे बयान दाखल केलाय आणि अनावश्यक कायदेशीर प्रकरणाला व शंकाकुशंकांना पुर्णविराम दिला.
तद्वतच ती स्वतःच्या आईवडीलांवर आणि भावावर अमाफ प्रेम करीत असल्याने आईवडिलांवर कारवाई न करण्याची विनंती केली.तद्वतच माझे आईवडील माझ्यासाठी भविष्य आहेत हे सुद्धा कुमारी प्रिया ने स्पष्ट केले होते.
कुमारी प्रिया घराबाहेर पडल्यानंतर काही दिवस मैत्रींनीकडे ती राहात होती.ही बाब कुमार प्रतीक ची आई दिक्षा यांना कळताच त्यांनी प्रतीक व प्रिया सोबत सविस्तर चर्चा केली.
दोघांसोबत चर्चा केल्यानंतर वास्तव माहिती अंतर्गत सत्य परिस्थिती प्रतीक च्या आईला कळताच त्यांनी कुमारी प्रियाला सहारा दिला आणि स्वतःच्या मुली प्रमाणे आजपर्यंत सांभाळ केलाय..
कारण कुमार प्रतीकचे उत्तम संगोपन आणि योग्य शिक्षण आई दिक्षा यांनी केले असल्याने त्याच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी समजदारी ने योग्य निर्णय घेणे आणि आवश्यक भुमिका वटवणे आई दिक्षा यांची जबाबदारी होती व आहे..त्या उत्तम जबाबदारी पार पाडत आहेत….
प्रतीक हा लहानपणापासूनच आई दिक्षा चे आईवडील म्हणजे आजी-आजोबा व आईचे भाऊ म्हणजे मामा,आईची वहिनी म्हणजे मामी यांच्या सान्निध्यात लाहण्याचा मोठा झालाय.यामुळे आजी-आजोबा,मामा-मामी यांना तो घरच्या सदस्या सारखा वाटतो आहे..आई दिक्षा यांची आई,भाऊ,वहिणी हे सर्वच त्याच्यासाठी अतिशय महत्वाचे नातेवाईक आहेत.
तसेच वडीलांकडेचे सुध्दा त्याच्यासाठी प्रिय आहेत.प्रतीक हा समजदार आणि शांत असल्याने सर्वांवर समान मैत्रीभावणेतून प्रेम करतोय,व त्याच कार्यपद्धतीने नाते सा़बाळतोय…
याचबरोबर प्रतीक चा मित्रपरिवार खूप मोठा आहे.त्याच्यावर जिव्हापाळ प्रेम करणारे त्याचे मित्र आहेत.असे मित्र क्वचितच एखाद्या व्यक्तीला मिळतात!
प्रतीककडे सध्या धनदौलत नाही,पण तो कुशाग्र बुध्दीमत्तेचा,आणि शांत,समजदार,स्वयंमी स्वभावाचा असल्याने त्याची ही दनदौलत भयंकर मोठी असल्याचे आढळून आले आहे.तो भविष्यात खूप मोठा व्यक्ती होण्याची चिन्हे आहेत.त्याचे आयुष्य उज्ज्वल भविष्यात आहे हे प्रामुख्याने लक्षात आले आहे..
चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील,”बुद्ध भुमी,चक चाटेपार येथे कुमार प्रतीक आणि कुमारी प्रिया,यांचा विवाह रितीरिवाजाप्रमाणे,तसेच अनेकांच्या साक्षीने खेळीमेळीच्या वातावरणात काल संपन्न झालाय..
अँड.जयदेव दयाराम मून यांनी रितीरिवाजाप्रमाणे व संस्कृती प्रमाणे लग्न समारंभ अनेकांच्या साक्षीने पार पडलाय.. आणि सर्व प्रकारची कायदेशीर प्रक्रिया त्यांनी पूर्ण केली…
महत्त्वपूर्ण….
कुमारी प्रिया ही आपल्या भुमिकांवर व निर्णयावर ठाम राहणारी मुलगी असल्याचे पुढे आले आहे.
तद्वतच तीला जातीभेदाच्या आणि धर्म भेदाच्या चौकटी शिवत नसल्याचे व बंधने लादत नसल्याचे स्पष्ट झाल्याने ती समतातंर्गत विचारसरणीला अनुसरून वर्तणूक करते आहे आणि याच विचारातंर्गत पुढील आयुष्याला ती साकारणार आहे…
आजच्या स्थितीत सुध्दा महाराष्ट्र राज्यासह भारत देशात जातीयवादला अनन्यसाधारण महत्त्व आहे.जातीच्या चौकटीच्या बाहेर पडायला योग्य विचार आणि उत्तम भुमिका लागतात…
प्रिया कडे समतातंर्गत उत्तम विचार आहेत आणि योग्य भुमिका घेण्याची निर्णय क्षमता सुध्दा तिच्याकडे आहे.यामुळेच तिने आंतरजातीय विवाह करण्याला महत्त्व दिले असल्याचे तिच्या कार्यपद्धतीवरुन लक्षात आले...
जातीच्या पलिकडे पडून योग्य जिवन जगणे एकप्रकारे कसरत असतय.पण,योग्य विचार आणि उत्तम भुमिका असल्या तर निर्णय चुकत नाही आणि संसारही सातत्याने फुलतोय हे प्रियाने दाखवून दिले आहे...
तद्वतच तिचा साथीदार म्हणजे पती प्रतीक हे प्रेमळ व मैत्रीपूर्ण संबंध जपणारे आहेत.त्याच्याकडे योग्य ज्ञान व समजदारी आहे.
यामुळे ते मरेपर्यंत एकमेकांना सांभाळून घेणार हे निश्चित झाले आहे..



