डुमरी बसस्टॉपवर देशीकट्ट्यासह आरोपीला केली अटक..

 

     कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:- नागपूर ग्रामीण स्थानिय गुन्हे शाखा पथकाचे सहायक पो.नि.अनील राऊत,hc नाना राऊत,hc ईकबाल शेख,npc वीरू नरड,pc अभिषेक देखमुख,npc मोनू शुक्ला,हे कन्हान पोलिस स्टेशन कन्हान हद्दीत पेट्रोलिंग करीत असता गुप्त माहिती द्वारा  माहिती मिळाली रामटेक येथे राहणारा राहुल फुलझेले हा युवक आपले जवळ देशी कट्टा बाळगून अप्रीय घटना करण्याचे  उद्देशाने डुंमरी बस स्टाफ येथे बसून आहे.

            गोपनीय माहितीच्या आधारे सदर ठिकाणी जाऊन आरोपी व्यक्तीस ताब्यात घेऊन पंचा समक्ष त्यांची झडती घेतली असता त्याचे जवळ एक लोखंडी देशी कट्टा,एक जिवंत कारतुस मीळुन आले.

       आरोपी राहुल भारत फुलझेले वय २५ वर्ष रा.रामटेक यांचे कडे एक लोखंडी देशीकट्टा कींमत ३० हजार रु.एक जिवंत कारतुस कींमत १ हजार रुपये असा एकूण की. ३१०००-/रु

किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व आरोपीला अटक करून पूढील कार्यवाही कामी पो.स्टे.कन्हान येथे आणुन स्थानिय गुन्हे शाखा ना.ग्रा. पथकानी आपल्या ताब्यातील आरोपी पुढील कार्यवाही करिता कन्हान पोस्टे पो.नि.प्रमोद मकेश्वर यांचे ताब्यात देण्यात आले.

     स्थानिय गुन्हे शाखा ना.ग्रा. च्या पथकाची कार्यवाही पोलीस अधीक्षक नागपूर(ग्रामीण) श्री. विशाल आनंद,(भा.पो.से.) तसेच अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.श्री. संदीप पखाले यांचे आदेशाने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे याचे मार्गदर्शनात सहायक पो नि , API अनील राऊत, HC पो हवा नाना राऊत, HC पों हवा ईकबाल शेख, NPC नापोशि वीरू नरड, चालक NPC नापोशी मोनू शुक्ला, PC पोशी अभिषेक देशमुख यांनी यशस्वी रित्या कार्यवाही पार पाडली.