जिल्ह्यात युवक काँग्रेस ला अधिक मजबुत बनविणार – लॉरेन्स गेडाम

 

पंकज चहांदे

दखल न्यूज भारत

 

देसाईगंज

      गडचिरोली जिल्ह्यात युवक काँग्रेसला तळागळापर्यंत पोहचवून पक्ष अधिक बळकट करून मजबुत बनविणार असल्याचे प्रतिपादन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लॉरेन्स आनंदराव गेडाम यांनी केले.

     तालुका युवक कॉंग्रेस च्या वतीने दि. १५ मे २०२३ ला स्थानिक विश्राम गृह येथे तालुकास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून लॉरेन्स गेडाम युकाँच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. बैठकीला जिल्हा सरचिटणीस नरेंद्र गजपुरे, तालुका कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, किसान सेलचे अध्यक्ष अभय नाकाडे, आदिवासी काँग्रेस तालुकाध्यकक्षा जयमाला पेंदाम, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष नितीन राऊत, संजय करंकर, सचिव जगदिश शेंद्रे, महेंद्र खरकाटे, महासचिव मनोहर निमजे, निरीक्षक टिकाराम सहारे, सुरेश मेश्राम, पुष्पा कोहपरे सह युवक काँग्रेस चे पदाधिकारी उपस्थित होते.

     पुढे बोलतांना गेडाम म्हणाले की, पक्षात गटागटाचे राजकारण सुरू असल्याने सामान्य कार्यकर्ता डावलला जातोय, परंतु ते आता खपवून घेतले जाणार नाही. सर्वांना एकत्र येऊन एकजुटीने कार्य करणे गरजेचे आहे. गाव तिथे युवक कॉंग्रेस व युवक आघाडी शहरापर्यंत पोहचविण्याकरीता पदाधिकारी सह कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

     बैठकीत “युवक कॉंग्रेस आपल्या दारी” हा उपक्रम देसाईगंज तालुक्यात राबविण्याचे ठरविण्यात आले. याअंतर्गत नागरिकांचे आभा व श्रम कार्ड मोफत काढून लगेच नागरिकांना त्याची ईप्रत देण्यात येईल. याची सुरुवात पुढील आठवड्यात गांधीनगर गावातून होणार असून यानंतर टप्याटप्याने तालुक्यातील अनेक गावांत याचे कॅम्प लावून नागरिकांचे वरील कार्ड काढण्यात येईल.

      कार्यक्रमाचे संचालन युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष पंकज चहांदे यांनी केले तर आभार शहर अध्यक्ष विक्की डांगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेकरीला युवक कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष देवनाथ सयाम, अमर भर्रे, मच्छिंद्र मातेरे, जयपाल धोंडने, कोषाध्यक्ष विनोद चंडीकार, तालुका महासचिव अमर बगमारे, महेश चंडीकार, तालुका सरचिटणीस प्रशांत मैंद, अक्षय दामले, चंद्रकांत भर्रे आदींनी परिश्रम घेतले.

     युवक काँग्रेसच्या या उपक्रमाने तालुक्यातील जनतेला मोफत आभा व श्रम कार्ड काढून मिळणार असल्याने याकरिता पुढील आठवड्यापासून तारीख निहाय कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती युवक काँग्रेस चे तालुका अध्यक्ष पंकज चहांदे यांनी सांगितले.

युकाँच्या बैठकीत पक्षप्रवेश

        युवक काँग्रेस च्या वतीने तालुक्यात “युवक काँग्रेस आपल्या दारी” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याने याचाच नुकतेच विश्राम गृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकी दरम्यान शहर युवक काँग्रेसमध्ये तीन युवकांनी पक्षप्रवेश केला. शहर सहसचिव पदी चेतन मेंढे, शहर सरचिटणीस पदावर ओमकार कामथे व अमोल टोटावार याची निवड शहर अध्यक्ष विक्की डांगे यांनी जिल्हाध्यक्ष लॉरेंस गेडाम यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन केली.