भारत सरकारची नोटरी पदी ॲड.नाझीमभाई शेख सर यांची निवड…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

आळंदी : येथील प्रसिद्ध विधीतज्ञ व इतिहास संशोधक ॲड.नाझीमभाई शेख सर यांना नुकतीच भारत सरकारची नोटरी पदी निवड झाली आहे. ॲड.शेख सर हे आळंदी शहराचा पौराणिक ऐतिहासिक वारसा या विषयावर अभ्यास करत आहेत. तसेच त्यांनी आळंदीत पुरातन जलकुंडाचा अभ्यास करून त्या कुंडाचा शोध घेतला आहे.

          ॲड.शेख सर यांनी शालेय विद्यार्थ्यांची शिकवणी घेऊन आपले विधीचे शिक्षण पुर्ण केले. दहा वर्षांपासून पुणे आणि खेड तसेच इतर तालुक्यात दिवाणी व फौजदारी याचिकांवर काम सुरू केले. किमान १० वर्षे वकीली अनुभवानंतर नोटरी बाबतच्या परीक्षेस पात्र ठरविण्यात येते. त्यानुसार ॲड.नाझीमभाई शेख सर यांनी तशी परीक्षा देऊन पात्र झाले आणि भारत सरकारने नोटरीची सनद दिली. यांच्या यशाबद्दल आळंदी व परिसरातील नातेवाईक, मित्र मंडळ व आळंदीकर ग्रामस्थ‌ यांच्या कडून अभिनंदन व कौतुक होत आहे.