जीवनात यशस्वी होण्यासाठी संघर्ष करावा लागेल :- पोलीस निरीक्षक संतोष बाकल…

     रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि

चिमूर:-

            गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय येथे राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

         या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी चिमूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष बाकल हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्याना सांगितले की,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानी आपल्या मनातील न्युनगंड, भिती काढून टाकली पाहीजे. आत्मविश्वास अंगी बाणविला पाहिजे. आत्माविश्वासाच्या बळावर स्पर्धा परिक्षेत यशस्वी होण्यासाठी जीवनात संघर्ष करावा लागेल.

          कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक यावले होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, विद्यार्थ्यांनी चुकामधून शिकले पाहिजे. राष्ट्रीय छात्र सेना(NCC) च्या विद्यार्थ्यांनी देशाप्रती त्याग, समर्पण ची भावना अंगिकारली पाहिजे. त्यांनी1972 च्या भारत- पाकिस्थान युद्धातील सरसेनापती सॅम माणेकशॉ यांच्या कामगिरी वर प्रकाश टाकाला.

             प्राचार्य डॉ.अश्विन चंदेल यांनी आपल्या मार्गदर्शनात राष्ट्रीय छात्र सेनेचा गौरवपूर्ण इतिहास सांगितला.

           तसेच कार्यक्रमाचे प्रयोजन विशद केले. त्यांनी राष्ट्रीय छात्र सेना विद्यार्थ्यांना भावी यशासाठी शुभेच्छा दिल्या.

            या प्रसंगी गांधी सेवा शिक्षण समितीचे सचिव विनायकराव कापसे, सदस्य कुसुमराव कडवे उपस्थित होते. प्रास्ताविक लेप्टनंट , प्रोफेसर डॉ. प्रफुल्ल बन्सोड यांनी केले. त्यांनी महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्याचा यशाचा चढता आलेख मांडला.

           महाविद्यालयातील एन. एन. सी चे छात्र लष्करात विविध पदावर जाऊन देशाची सेवा करीत आहेत. हा महाविद्यालयाचा गौरव आहे असे प्रतिपादन केले.

            याप्रसंगी राष्ट्रीय छात्र सेना विद्यार्थ्यानी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कु नंदीनी पोपटे तर आभार कु सामिक्षा बावने हिने मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.