कलाबाई कन्या विद्यालयात क्रीडा सत्र संपन्न… — क्रीडा शिक्षकाचा व मान्यवरांचा स्वागत न करताच बक्षीस वितरण… — विद्यार्थी व पालकांमध्ये चर्चेला उधाण…

      ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

          साकोली:- येथील कलाबाई कन्या विद्यालय व आनंदाबाई कन्या प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत वार्षिक क्रीडा सत्र १३ जानेवारी रोजी क्रीडा शिक्षकांच्या स्वागत न करता संपन्न झाला. यात शाळेतील विध्यार्थीनीचा मोठा सहभाग पहावयास मिळाला.

          पार पडलेल्या या वार्षिक क्रीडा सत्रात सगळ्याचा सहभाग पाहण्या सारखा होता.विद्यार्थ्यांमध्ये काही वेगळाच जोश होता,जे सहभागी नव्हते तेही आपल्या आवडत्या खेळाडूचे मनोबल वाढवत असताना पाहायला मिळाले.शिक्षणाबरोबर खेळाला महत्व दिले पाहिजे, भविष्यात येणाऱ्या आव्हांनाना सामोरे जाण्याचे सामर्थ्य खेळातून मिळते

          क्रीडा सत्रात विविध स्पर्धा क्रीडा शिक्षक हत्तीमारे व प्रा.कापगते यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.

              परंतु बक्षीस वितरनाच्या वेळेस मान्यवर उपस्थित असताना नाव न घेणे व क्रीडा शिक्षक यांचे स्वागत न केल्यामुळे विद्यार्थिनी आणि पालक यांच्यात चर्चा रंगली. परंतु संचालन करणाऱ्यांनी सगळ्यांचे स्वागत केले परंतु उपस्थित मान्यवरांचे सुचविल्या नंतर स्वागत करण्यात आले. क्रीडा शिक्षकाना मंचावर बोलवले नाही आणि स्वागत सुध्धा केले नाही.

          विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष से.नि. शिक्षक मस्के हे होते.तर कलाबाई कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक चोले आनंदाबाई कन्या विद्यालय चे मुख्याध्यापक राऊत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाविका येवले,प्रा.कापगते,शेख,बडोले,तसेच शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष ऋग्वेद येवले प्रमुख पाहुणे म्हणून होते.

            तसेच मंचावर सौ.नगरकर, झिंगरे भुरे माटुरकर, राऊत, शेख व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमानंतर स्नेहभोज देण्यात आले.

             कार्यक्रमाचे संचालन राऊत यांनी केले तर आभार श्रीमती नगरकर शिक्षिका यांनी मानले.