Home Political जातीय दंगली थांबविण्यासाठी वंचितच्या उमेदवारांना निवडून द्या :- ऍड.बाळासाहेब आंबेडकर… —...

जातीय दंगली थांबविण्यासाठी वंचितच्या उमेदवारांना निवडून द्या :- ऍड.बाळासाहेब आंबेडकर… — दर्यापूरात वंचित बहुजन आघाडीची रेकॉर्ड ब्रेक विजय संकल्प सभा…

युवराज डोंगरे 

   उपसंपादक

दर्यापूर :- राज्यात विधानसभा निवडणुकांचा प्रचार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. अनेक पक्षांचे मोठे नेते राज्यात सभा घेत आहेत, सर्वत्र प्रचाराचा धुराळा उडत असल्याचं चित्र आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची आज दिनांक 15 नोव्हेंबरला दर्यापूरात मोठ्या प्रमाणात सभा पार पडली.

           ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती बिघडल्याने काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. आता त्यांची प्रकृती सुधारल्याने ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं दिसून येत आहे. 

           वेळोवेळी होत असलेल्या जातीय दंगली थांबवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान करुन प्रतीनिधीत्व करण्याची संधी द्या असे प्रतीपादन अँड.बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.

           वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अंकुश वाकपांजर यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी आयोजित बसस्थानकासमोरील कन्या शाळेत विजय संकल्प सभेत प्रकाश आंबेडकर बोलत होते पुढे बोलतांना आंबेडकर म्हणालेत ओबीसी,एससी,एसटी आरक्षण धोक्यात आले आहे‌.

          मुस्लिम समाजाने एकजुटीने वंचितांच्या पाठीशी उभे असे ठाकरे आजही जाहीरपणे सांगतात की, माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मशीद शहीद केली त्याबद्दल मला अभिमान आहे. मी मुस्लिमांना विचारतो लोकसभेत संविधानाच्या मुद्द्यावर तुम्ही त्यांना मतदान दिले, पण आता काय आहे ? तुम्ही ज्यांचे स्मरण करून नमाज अदा करता त्या मोहम्मद पैगंबर यांचं बिल येत असेल आणि ते बिल वंचित बहुजन आघाडी आणत असेल तर तुम्ही वंचितला का मतदान करत नाहीत याचा खुलासा करायला पाहिजे.

         तसेच महाविकास आघाडी व महायुतीचा चांगलाच खरपुस समाचार घेतला आहे. दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदार संघातील साखर कारखाना सूत गिरणी हे बंद पडलेले उदयोग पुन्हा चालू करण्यात येतील, दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदार संघातील विकास कामावरती.

         यावेळी व्यासपीठावर वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा.धैर्यवर्धन पुंडकर यांच्यासह जिल्हाध्यक्ष संजय चौरपगार,पुंडलीक वाट, सदानंद नागे,जिल्हा महासचिव साहेबराव वाकपांजर, अब्दुल सलीम जमादार संतोष बगाडे.धर्मेंद्र आठवले,गणेश कुटेमाटे,अशोक नवलकार,अशोक दुधंडे आदी उपस्थित होते.