Home Social मुनघाटे महाविद्यालयात “ए पी जे अब्दुल कलाम जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन” साजरा…

मुनघाटे महाविद्यालयात “ए पी जे अब्दुल कलाम जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन” साजरा…

भाविकदास करमनकर

 धानोरा तालुका प्रतिनिधी 

        स्थानीक, धानोरा येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली व्दारा- संचालित श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे,कला-वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने दिनांक १५/१०/२०२५ रोजी भारतरत्न, डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘वाचन प्रेरणा दिन’साजरा करण्यात आला.

        याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्धानी प्राचार्य डॉ.उदय थुल उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरूवात ‘ए पी जे अब्दुल कलाम ‘ यांच्या प्रतिमेसमोर पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलनाने करण्यांत आली. यावेळी प्राचार्य डॉ उदय थुल यांनी अध्यक्षीय मनोगतातून वाचन हे ज्ञान, मूल्ये आणि आत्मविकासाचे मुलभूत साधन असल्याचे विद्यार्थ्यांना पटवून दिले तर ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. प्रवीण गोहणे यांनी वाचनाचे महत्व विशद करून डॉ अब्दुल कलाम यांच्या विचार व कार्यावर प्रकाश टाकला.

       याप्रसंगी श्रीमती, छाया चंदेल,श्री गणेश लांबट, श्री भाष्कर वाढणकर, श्री बालाजी राजगडे यांची उपस्थिती होती.

              कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक डॉ प्रवीण गोहणे यांनी तर आभार प्रदर्शन श्री गणेश लांबट यांनी केले यावेळी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.