वृद्ध महिला हरवली..

 

  कैलास गजबे

प्रतिनिधी कारजगाव 

       चांदुरबाजार तालुक्यातिल गोविंदपुर ( करजगाव) येथील रहीवासी असलेली वृध्द महीला अंजना आकाराम बनसोड ह्या दिनांक १४ जुन रोजी चांदुरबाजार बस डेपो येथून हरवल्या आहेत.

       ही महीला मानसीक बिमार आहे असे तिच्या पतिकडुन माहीती मिळाली.या महीलेजवळ पैसे किंवा कोणत्याच प्रकारचे सामान नाही व त्या महीलेने रंगीत साडी नेसलेली आहे आणि डोक्यावर चश्मा आहे.

       कुठल्यातरी एसटी बसमध्ये बसुन गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे.तरी कुणालाही दिसल्यास, ९११२११५२८२ या फोन नंबरवर फोन करावा किंवा चांदुरबाजार पोलीस स्टेशनशी संपर्क करावा असे आवाहन महीलाचे पती आकाराम बनसोड राहणार गोविंदपुर पो.करजगाव ता.चांदुरबाजार जि.अमरावती यांनी केले आहे.