देशी कट्टा व जिवंत कारतुस सह आरोपीला अटक. — कन्हान पो.स्टे.डि.बी.पथकाची कारवाई..

 

कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

,पारशिवनी:- पोलीस ठाणे कन्हान येथील डी.बी.पथकातील एपीआय. सी‌.बी.चव्हाण,पो.हवा मुदस्सर जमाल,पो.शि.अश्विन गजभिये,वैभव बोरपल्ले,आकाश सिरसाट,हे पो.स्टे.परिसरात आज दुपारी पेट्रोलिंग करिता असता पो.स्टे. हद्दीतील दुर्गा मंदिर जवळ पिपरी,कन्हान येथे राहणारा पुरुषोत्तम बबन आकोने वय 35 वर्ष याचे घर झडतीत अवैध रित्या एक लोखंडी देशी कट्टा किमत १५ हजार रुपये व एक 8mm चा जिवंत काढतूस किमत १ हजार रुपये अवैध रित्या विना परवाना मिळून आल्याने जप्त केले.

        यानंतर पो.स्टे.येथे तक्रारदार पो.हवा.मुदस्सर यांचे तक्रारी वरून अपराध क्रमांक३६५/२३ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया केली असुन कलम ३/२५ नुसार कार्यवाही करून आरोपीला अटक केले.

     ही कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री.विशाल आनंद,अप्पर पोलीस अधीक्षक श्री.संदीप पखाले,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अशित कांबळे व वरिष्ठ पो.नि.प्रमोद मकेश्वर यांचे नेतृत्वात कन्हान पोस्टेच्या डी.बी.पथकातील api सी.बी.चव्हान कर्मचारी पोहवा /मुदस्सर जमाल,पो.शि / वैभव बोरपल्ले,पोशि /अश्विन गजभिये, आकाश सिरसाट पो. शी./ सम्राट वनपर्थी, निखिल मिश्रा यांनी यशस्वी कार्यवाही केली.