Home Social विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती…  — जेतवन बुद्ध विहार...

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती…  — जेतवन बुद्ध विहार मालेवाडा येथे साजरी… — मालेवाड्यात निनादला जय भीम चा नारा…

शुभम गजभिये..

  विशेष प्रतिनिधी..

    चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार,मालेवाडा येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

     

       यावेळी गावातिल मुख्य रस्त्याने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महाकारुनिक तथागत भगवान गौतम बुद्ध,महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांसह मिरवणूक (रॅली) काढण्यात आली.

       जय भीम चा जयघोष करत डीजेच्या धुमाल तालावर थिरकत विहाराचे प्रांगणात मिरवणुकीची सांगता करण्यात आली.

      याप्रसंगी समस्त बौध्दजन तथा गावकरी उपस्थित होते.