कुरखेडा तालूक्यात ठिकठिकाणी निरंकारी सत्संग व महाप्रसादाचे आयोजन… 

    राकेश चव्हाण

कूरखेडा तालुका प्रतिनिधी 

         निरंकारी सदगूरू माता सुदिक्षा सविंदर हरदेवसिंहजी महाराज यांचा एकता,विश्वबंधूता,सूख,शांती व अंतरमनाची द्विधा दूर करण्याचा संदेश घेत महात्मा गुलाबरावजी धूर्वे तालूक्यात ३ दिवस ठिकठिकाणी आध्यात्मिक सत्संग द्वारे संदेश देणार आहेत .

        संत निरंकारी मंडळ दिल्ली शाखा कूरखेडा यांचाद्वारे भरनोली येथे दि १९ फेब्रूवारी सोमवार रोजी सोनसरी येथे २० फेब्रूवारी मंगळवार रोजी तर पलसगड येथे २१ फेब्रूवारी बूधवार रोजी जामणी वर्धा येथील महात्मा गुलाबरावजी धूर्वे यांच्या सानिध्यात आध्यात्मिक सत्संग सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्संगाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन संत निरंकारी मंडळ शाखा कूरखेडा चा वतीने करण्यात आले.