Home Political प्रवीण भैय्या माने यांना एकच वेळ भरघोस मतदान करा:- माजी सभापती मयूरशिंह...

प्रवीण भैय्या माने यांना एकच वेळ भरघोस मतदान करा:- माजी सभापती मयूरशिंह पाटील यांचे आवाहन… — प्रवीण भैय्या माने यांची लासुरने व सराटी येथे आज होणार मोठी जाहीर सभा…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

       इंदापूर तालुका विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रवीण भैया माने यांची जाहीर सभा, व मतदारांना किटली समोरील चिन्हावर बटन दाबून मतदान करण्यासाठी आवाहन करणारणारी जाहीर सभा,आज होणार आहे.सदर सभा मोठी होणार असल्याचे पुढे आले आहे.

        गुरवार दिनांक 14/ 11/ 20 24 रोजी सायंकाळी 5 वाजता लासुरने तर संध्याकाळी 7.30 वाजता सराटी या गावामध्ये मोठी जाहीर सभा होणार असल्यामुळे प्रत्येक गावामध्ये मतदारांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

      यामुळे प्रवीण भैय्या माने यांचे मोठ्या उत्साहात कार्यकर्त्याच्या वतीने मोठ्या प्रमाणात स्वागतही होत आहे.छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचाही पाठिंबा मिळत आहे.पाठिंबा दिलेल्या कार्यकर्त्यांचाही सन्मान उमेदवार प्रवीण भैय्या माने करीत आहेत.

        आजच्या सभेसाठी प्रमुख उपस्थिती इंदापूर तालुका विधानसभेचे उमेदवार माजी सभापती प्रवीण भैया माने,प्रचार प्रमुख माजी पंचायत समिती सभापती मयूरशिह पाटील,यांच्यासहित,शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे,प्रचार प्रमुख मयूरसिंह पाटील सांगीतले.

         प्रमुख कार्यकर्त्यांच्या व आदी मान्यवरांच्या उपस्थित जाहीर सभा होणार असल्याचे माजी सभापती मयूरशिह पाटील यांनी यावेळी सांगितले..