ने.हि .विदयाचे कुस्तीपटू विभागीय स्तरावर…. — सर्वत्र अभिनंदन…

 

ब्रह्मापुरी/चंद्रपूर.

    प्रतिनिधी 

        राज्य क्रीडा व युवक संचालनालय पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 सप्टेंबर 2023 रा संपन्न झालेल्या चुरशीच्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत विजय संपादन करून ने.हि.उच्च माध्यमिक विद्यालय ब्रम्हपूरी येथील चार कुस्ती पटूनी बाजी मारली.

           पुढील होऊ घातलेल्या (देवडी) जिल्हा वर्धा येथील विभागीय स्पर्धेकरिता त्यांची निवड करण्यात आपली आहे.

         फ्री स्टाईल आदित्य किशोर बावनकुळे वर्ग ९ वा 45 किलो वजन गट, फ्री स्टाईल तन्मय गजानन कुर्झेकर वर्ग ९ वा 48 किलो वजन गट,रितिक सुनील दिवटे वर्ग ९ वा 45 किलोग्राम वजन गट,अमन गिरीश कुर्वे वर्ग ८वा 62 किलो फ्रीस्टाईल,या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेकरिता संस्थेचे सचिव अशोकजी भैय्या,सहसचिव एड. भास्करराव उराडे,विद्यालयाचे मुख्याध्यापक जी.एन.रणदिवे, उपमुख्याध्यापक के.एम.नाईक,पर्यवेक्षक ए.डब्ल्यू. नाकाडे,प्रशिक्षक विनोद दिवटे,व्यवस्थापक मोनीश ऊराडे तथा सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून विभागीय स्पर्धेकरिता शुभेच्छा विद्या आहेत.