काळाल ढोडा नाल्यात गेले तिघे जण वाहून…  — बाल-बाल वाचले तिघांचे जीव… 

 

भाविक करमनकर 

धानोरा प्रतिनिधी

आज दिनांक 14/9/23 रोजी जपतलाई करंगामिटोला ते चुडियाल या मधोमध काळाल ढोडा नाला व वरके कसा नाला असे दोन नाले चुडियाला जाण्यासाठी पडतात आज दिवसभर पाऊस सुरू असल्याने व करंगामी टोल्याजवळील काळालढोडा नाला हा खाली तसेच या नाल्यावर पूल नसून रपटा असल्याने लवकरच त्या नाल्याला पाणी येऊन नाला पूर्ण भरतो आज दुपारपासूनच त्या नाल्यावर तीन ते चार फूट पाणी त्याहीपेक्षा जास्त पुलावर पाणी असताना काही नागरिक जाण्याचा प्रयत्न केले असता त्या नाल्यावरून सायंकाळी चार वाजता च्या सुमारास रामू साजन हलामी निमगाव चा व्यक्ति काही कामानिमित्त चुडियाल्ला जात असताना त्याचा तोल जाऊन त्या नदीमध्ये नाल्यामध्ये पडला व काही अंतरावर वाहत गेल्यावर एका झुडपाला अडकल्यामुळे त्याचा जीव वाचला तसेच सायंकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान दोघेजण यशवंत खेवले जपतलाई यांची गाडी घेऊन खुशाल काटेंगे राहणार मोवाळ व शेषराव कुमोटी तोयागोंदी असे दोघेजण जपतलाई वरून चुडियाला जाण्याचा प्रयत्न करीत असताना सायंकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान त्या काला काळाल ढोडा या नाल्यावर जवळपास चार फूट पाणी असताना दुचाकी गाडी टाकण्याचा प्रयत्न केला करत होते त्यावेळेस गावातील नागरिक करंगामी टोल्यातील नागरिक त्यांना अडविण्याचा प्रयत्न करत होते परंतु जबरदस्तीने त्यांनी गाडी टाकण्याचा प्रयत्न केला व काही दूर जात नाही तोच त्यांची गाडी त्या पुलाच्या खाली पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे गाडी पुलाच्या खाली पडली व ते दोघेजण गाडीसहित वाहून गेले परंतु काही अंतरावर ते एका झुडपाला अडकल्यामुळे त्या दोघांचाही जीव वाचला व गाडी वाहून गेली अजून पर्यंत गाडीचा पत्ता लागलेला नाही मात्र दोघेजनाचा जीव वाचला रस्ता बंद असल्यामुळे काही नागरिक जपतलाई येथे अडकून आहेत ही सर्व हकीकत चुडियल चे अनिल दुगा यांनी सांगितली तो स्वतः अडकून आहे काळाल ढोडा या करंगामी टोल्याजवळ असणारा नाला हा खूपच खाली असल्यामुळे पाऊस पडला की लवकरच तो भरतो आणि म्हणून त्या गावातील जपतलाई व करंगामी टोल्यातील तसेच चुडीयाल येथील नागरिकांची त्या पुलाची उंची वाढविण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे साधारणतः पाऊस जरी आला तरी त्या नाल्याला पाणी येऊन चुडेल ते जप्तलाई हा रस्ता बंद होतो आणि म्हणून प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी जपलाय करंगामी चुडीयाल च्या नागरिकांनी केली आहे