Home Maharashtra ऐन शेतीच्या हंगामात बॅंकाकडून शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी नोटीस दिली जात असल्याने महाराष्ट्र...

ऐन शेतीच्या हंगामात बॅंकाकडून शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी नोटीस दिली जात असल्याने महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने होणार काय?

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक..

     शेतकऱ्यांच्या बाजूने सरकार राहील असे वारंवार सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.म्हणूनच शेतकऱ्यांना कर्ज वसुली संबंधाने बॅंक द्वारे नोटीस दिली जात असल्याने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी विशेष लक्ष शेतकऱ्यांच्या हिताकडे देणे आवश्यक आहे..

         बॅंकाकडून शेतकऱ्यांना पाठविलेल्या नोटीस मध्ये कर्ज वसुली व शेतकऱ्यांची शेतजमीन जप्त करण्याचे नमुद आहे.याचबरोबर विविध योजना अंतर्गत बॅंकेत जमा झालेले रुपये हे कर्जात वळते करणार असेही नोटिस मध्ये नमूद आहे.

         ऐन शेती मशागतीच्या वेळेत कर्ज वसुलीसाठी नोटीस पाठवून शेतकऱ्यांना विविध कारणास्तव अळचणीत आणण्याचा सपाटा बॅंकाकडून सुरू झाला असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

             एकीकडे महाराष्ट्र सरकार म्हणतय शेतकऱ्यांचे कर्ज माफ करुन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु तर दुसरीकडे बॅंक व्यवस्थापक नोटीस पाठवून म्हणतात शेतजमिनी जप्त करु!

        महाराष्ट्र राज्यातील शेतकरी हे महाराष्ट्र सरकार आणि विविध बॅंकेच्या चौकटीत फसले असून त्यांना या दुहेरी चौकटीतून महाराष्ट्र सरकार सरसकट कर्ज माफ करुन बाहेर काढू शकते एवढे मात्र खरे आहे..

        महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या बिकट आर्थिक समस्या बघता,त्यांना गंभीर आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र सरकार वेळीच पुढे येणार असा आशावाद शेतकऱ्यांना आहे.