Home सांस्कृतिक प्रबोधनकार संघटनेच्या वतीने कलावंतांच्या मागण्यांचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन…

प्रबोधनकार संघटनेच्या वतीने कलावंतांच्या मागण्यांचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली : प्रबोधनकार कला साहित्य संघटना भंडारा जिल्ह्याच्या वतीने सन 2023-24 मध्ये राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यीक व कलावन्त मानधन समिती मार्फत ऑनलाइन फार्म भरलेले होते.

        त्यामध्ये जिल्ह्यातील 100 कलावंतांची निवड करण्यात आली.पण तीन महिने होऊन सुद्धा निवड झालेल्या कलावंतांना मानधन जमा झाले नाही.

      त्यासंदर्भात प्रबोधकार कला साहित्य संघटना भंडारा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते व उप मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश नंदागवळी यांना निवेदन देण्यात आले.

       त्यावेळी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष भावेश कोटांगले, केंद्रीय संयोजक मनोज कोटांगले, विनोद बन्सोड, रुपेश येचंलवार, गणेश आथिलकर, कळवू धुळसे, रामदास येलमुले, दीपक मेश्राम, कार्तिक मेश्राम उपस्थित होते.