ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली : शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा आणि तालुका कार्यकारिणीची नव्याने निवड करुन पक्ष विस्तार करण्यासंबंधात चर्चा करण्यासाठी शनिवारी १७ जूनला पक्ष सभासदांची सभा आयोजित करण्यात आली आहे.
स्थानिक प्रेस क्लब सभागृहात सकाळी ११ वाजता होणाऱ्या या सभेत शेतकरी कामगार पक्षाच्या नवीन जिल्हा व तालुका समित्यांचे सदस्य निवडीवर चर्चा करण्यात येवून मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. यासोबतच येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुका लढण्यासंबंधाने पक्षाचे स्थानिक स्तरावरची भूमिका आणि नियोजन ठरविण्यात येणार आहे.
त्यामुळे पक्षाचे गाव शाखेचे चिटणीस, खजिनदार, सहचिटणीस आणि सक्रिय पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर यांनी केले आहे.