भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
स्थानिक धानोरा येथील बौद्ध समाज मंडळ च्या वतीने दिनांक 14 एप्रिल ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मदिनानिमित्त त्यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली.
याप्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने करण्यात आली ध्वजारोहण डॉ.रश्मी ज्ञानेश बनसोड यांचे शुभहस्ते करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत उपसरपंच मोहूर्ले, मार्गदर्शक प्रा.ज्ञानेश बनसोड, प्रमुख अतिथी म्हणून पीठाले ग्रामपंचायत अधिकारी दूधमांळा, श्रीमती उईके पोलिस पाटील, सीताराम जी शेंडे ज्येष्ठ नागरिक,तथा अन्य मान्यवर मंचावर विराजमान होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थी दशेपासून संघर्ष केला व शिका संघटित व्हा व संघर्ष करा असा संदेश समाजाला दिला त्यांनी केवळ विशिष्ट समाज हिताचे काम केले नाही तर अखिल मानव जातीच्या हिताचे कार्य त्यांनी केले महिलांचे अधिकार ,सामाजिक विषमता,सामाजिक अन्याय अनिष्ट रूढी ,प्रथा परंपरा, इत्यादी बाबींना विरोध केला व त्या नष्ट झाल्या पाहिजेत याकरता विधायक मार्गाने संघर्ष करून लढा दिला.
त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांच्या आधारे विविध राष्ट्रात समस्यांचे निराकरण केल्या जाते तसेच कायदेविषयक व अर्थविषयक समाज विषयक विचार सतत राष्ट्र व समाजास मार्गदर्शक ठरत आहेत ते केवळ कायदेतज्ञच नाही तर अर्थशास्त्रज्ञ विचारवंत ,पत्रकार, लेखक विद्यार्थी होते.
त्यांना संपूर्ण विश्वात सिम्बॉल ऑफ नॉलेज या उपाधीने देखील ओळखल्या जाते.विषमता असलेल्या समाजात त्यांना शिक्षणाची संधी नाकारली गेलेली होती. त्यांनी आपल्या बुद्धिमत्ता व विद्वत्तेच्या बळावर संपूर्ण देशाला व विश्वाला मार्गदर्शन ठरतील असे विचार त्यांच्या ग्रंथात नमूद केलेले आहेत.
त्यांचे वैचारिक आचरण केल्यास समता प्रस्थापित होईल व सर्वांना विकासाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून स्वातंत्र्य, समता न्याय बंधुता प्रस्थापित करता येईल असे विचार डॉ. रश्मी बनसोड यांनी याप्रसंगी व्यक्त केले तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक न्याय ची प्रस्थापना झाली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता.
सामाजिक न्यायाची प्रस्थापना करायची असेल तर आर्थिक विषमता नष्ट करून आर्थिक समानता आधी प्रस्तावित करणे गरजेचे आहे याकरता लोकशाही सक्षम माध्यम आहे यातूनच सामाजिक न्यायाची प्रस्थापना होऊ शकते म्हणून भारतीय संविधानात लोकशाही शासन स्वीकार करण्यात आलेला आहे.
त्यांना दलित पद दलित म्हणून जी वागणूक मिळाली ती नष्ट झाली पाहिजे याकरिता त्यांनी भारतीय संविधानात मूलभूत अधिकारचा समावेश केला. लोकशाहीमध्ये लोकांचे महत्त्व कायम राहावे म्हणून सर्वांना समान मताधिकार अंतर्भूत करून दिलेत. संविधान कितीही चांगले असले तरी ते अमलात आणणारे व्यवस्था सक्षम असावि याकरता सुजान नागरिक लोकशाही करता गरजेचे आहे असे मार्गदर्शनातून प्रा.ज्ञानेश बनसोड यांनी विचार केले.अन्य मान्यवरांनी देखील प्रासंगिक विचार व्यक्त केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे संचालन अशोक बारसिंगे सर यांनी केले , प्रास्ताविकेतून बार्शिंगे सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन परिचय उलगडलां व मोलाचे मार्गदर्शन केले याप्रसंगी बौद्ध समाज मंडळ चे संपूर्ण उपासक व उपासिका यांनी कार्यक्रमाची सांगता सामूहिक बुद्ध वंदना ने केली. याप्रसंगी दूधमळा येथील ग्रामस्थ बहु संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्वांचे बहुमूल्य योगदान लाभले.



