Home Vidarbha अखंडित विद्यूत पूरवठ्याच्या मागणीकरीता हजारो शेतकरी धडकले उपविभागीय कार्यालयावर…

अखंडित विद्यूत पूरवठ्याच्या मागणीकरीता हजारो शेतकरी धडकले उपविभागीय कार्यालयावर…

     राजेंद्र रामटेके

कुरखेडा तालुका प्रतिनिधि 

कूरखेडा :- कृषीपंप तसेच घरगूती विद्यूत वाहीणीवर मागील काही दिवसापासून सूरू करण्यात आलेले भारनियमनामूळे त्रस्त येथील हजारोचा संख्येत उपस्थीत शेतकऱ्यांनी आज गांधी चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय कूरखेडा येथे शाशन व विद्यूत कंपनी विरोधात गगणभेदी घोषणाबाजी करीत मोर्चा काढला व कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन सूरू केले.

           तालूक्यात वेगवेगळ्या ठिकाणी मनमानी पद्धतीने विद्यूत विभागाचा वतीने भारनियमन सूरू आहे घोषित भारनियमन कालावधी होऊनही अनेक ठिकाणी वारंवार होणार्या विद्यूत बिघाडामूळे सूद्धा विद्यूत पूरवठा बंद असतो त्यामूळे‌ विद्यूत कृषी पंप बंद पडत रब्बी धान हंगाम धोक्यात आला आहे त्यामूळे संतप्त शेतकऱ्यांनी आज महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या कांग्रेस व शिवसेना (उबाठा) कडून पूकारण्यात आलेल्या मोर्चा व ठिय्या आंदोलनात हजारोचा संख्येत सहभागी होत उपविभागीय कार्यालय समोर आयोजित ठिय्या आंदोलनात विज वितरण कंपनी व शाशनाचा विरोधात तिव्र शब्दात रोष प्रकट केला.

         यावेळी मोर्चेकरूंचे निवेदन स्वीकारण्याकरीता आंदोलन स्थळी आलेले गडचिरोली येथील विद्यूत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता मेश्राम याना रोषाचा सामना करावा लागला.  कूरखेडा येथील उपविभागीय विद्यूत अभियंता मिथून मूरकूटे व कढोली येथील शाखा अभियंता झोडापे यांच्या विरोधात तिव्र रोष होता. मात्र ते आंदोलन स्थळी फिरकलेच नाही. त्यामूळे अनूचीत प्रसंग टळला.

          यावेळी पूर्ववत येथील विद्यूत पूरवठा अखंडित ठेवण्याचा मागणी करीता मोर्चेकरू अडून बसले होते.  विद्यूत विभाग व शासनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात येत असल्याने पेच निर्माण झाला होता.

          अखेर उपस्थीत कार्यकारी अभियंता यांचाशी भ्रमनध्वनीवर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मोर्चेकरूंचा समक्षच संपर्क साधला व कार्यकारी अभियंता मेश्राम यानी तालूक्यात भारनियमन संध्याकाळी ६ ते सकाळी ६ या कालावधीत करण्यात येणार नाही. तसेच दिवसा फक्त ४ तास कृषी पंपावर भारनियमन करण्यात येईल अशी लिखीत घोषणा केल्यावर शेतकऱ्यांचे समाधान होत आंदोलन मागे घेण्यात आले.

         मोर्चाचे नेतृत्व विधान परिषद सदस्य आ.अभिजीत वंजारी कांग्रेस जिलाध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे , शिवसेनाप्रमुख सुरेंद्र चंदेल, प्रदेश महासचिव डॉ नामदेव कीरसान माजी आमदार आनंदराव गेडाम, रामदास मसराम,माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, वामनराव सावसागडे, नगराध्यक्ष अनीताताई बोरकर कांग्रेस तालुका अध्यक्ष जीवन पाटील नाट जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटिल हरडे शिवसेना उबाठा तालुका अध्यक्ष आशिष काळे माजी जि प सदस्य प्रभाकर तूलावी माजी प स सभापती गिरीधर तितराम महिला कांग्रेस ता अध्यक्ष आशाताई तूलावी कांग्रेस अनूसूचित जाति सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे माजी सभापती परसराम टिकले शेतकरी नेते शाम मस्के आदि हजर होते.