20 वर्षीय विवाहितेस सोशल मीडिया वरुन धमकी देणाऱ्या युवका विरुध्द खल्लार पोलिसांत गुन्हा दाखल…

युवराज डोंगरे

   उपसंपादक

          खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील ग्राम कान्होली येथिल 20 वर्षीय विवाहीतेस सोशल मीडियावर धमकी देणाऱ्या युवकाविरुध्द खल्लार ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन या घटनेतील आरोपी फरार आहे.

           कान्होली येथील 20 वर्षीय विवाहितेच्या मोबाईलवर फोन करून आकाश नंनवारे रा.गायगाव जि. अकोला हा सोशल मीडियावर बदनाम करण्याची वारंवार धमकी देत होता. वारंवार येत असलेल्या फोनमुळे विवाहितेने नविन नंबर घेतला मात्र आरोपीने फिर्यादीच्या नविन नंबरवर देखील वारंवार फोन करुन सोशल मीडियावर बदनाम करण्याच्या धमक्या देने बंद केले नाही.

         या त्रासाला कंटाळून विवाहितेने खल्लार पोलिस स्टेशन गाठून आरोपीविरुध्द तक्रार नोंदविला या तक्रारीवरुन आरोपी आकाश नंनवारे विरुध्द कलम 354(ड),504,506 नुसार गुन्हा दाखल केला असुन आरोपीचा शोध घेणे सुरु आहे.