ऋग्वेद येवले
नागपूर विभागीय प्रतिनिधी
साकोली: येथील शिवनाग मंदिर येथे आमदार नानाभाऊ पटोले यांच्या स्थानिक विकास निधीतून सभागृहाचा भूमिपूजन सोहळा दिलीप मासुरकर शहर काँग्रेस अध्यक्ष ,जयाताई भुरे माजी पंचायत समिती सदस्य ,दामोदर नेवारे ,संदीप बावनकुळे यांच्या हस्ते पार पडला.
साकोली शहरातील पंचशील वार्डातील असलेले शिवनाग मंदिर मध्ये अनेक भाविक दररोज पूजा अर्चना करण्याकरिता येतात परंतु येथे येणाऱ्या भाविकांना बसण्याकरिता योग्य सभागृह नव्हते म्हणून येथील समाजसेवक व नागरिकांनी आमदार नानाभाऊ पटोले यांचा पाठपुरावा करून सात लाख रुपयांचा निधी मंजूर करून सभागृह उभारण्याकरिता दिनांक 14 मार्च 2023 ला भूमिपूजन करण्यात आला.
यावेळी नरेश भुरे,देवनाथ राहांगडाले ,पद्माकर डोमळे, प्रकाश कुरंजेकर, शीला वासनिक, सूर्यभान चेटूले, धनराज हुकरे, शैलेश हटवार, मोहन गिर्हेपुंजे, हरिभाऊ पातोडे, प्रकाश मस्के,एन.टी.बिसेन,पुष्पा राहांगडाले,सीमा करीया,नेहा करीया,जयकृष्ण खराबे, संगीता पळसकर, शामराव लांजेवार,व अनेक नागरिक उपस्थित होते.