संस्कार पब्लिक स्कूल कुरखेडा येथे स्वयंरोजगार व्यापार व उद्योग या क्षेत्रात आयुष्य घडवण्यासाठी मार्गदर्शन शिबिर…

    राकेश चव्हाण

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

          आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था द्वारा संचालित संस्कार पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कुरखेडा येथे स्वयंरोजगार व्यवसाय उद्योग व्यापार या क्षेत्रात आयुष्य घडवण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुरखेडा येथील शिक्षक बुराडे यांनी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन करून फक्त विद्यार्थ्यांनी नोकरीची आस न बाळगता विविध क्षेत्रात कला कौशल्याच्या माध्यमातून आपण आपला व्यक्तिमत्व घडवू शकतो असे प्रतिपादन त्यानी केलें.

            यावेळी विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच इतर क्षेत्राची माहिती व्हावी या दृष्टिकोनातून संस्कार पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कुरखेडा येथे विविध सामाजिक शैक्षणिक आर्थिक व साहित्यिक कार्यक्रम राबवले जात असल्याची माहिती संस्था सहसचिव प्राध्यापक नागेश्वर फाये यांनी माहिती दिली. 

           यावेळी व्यासपीठावर प्राचार्य देवेंद्र फाये, प्रा.नागेश्वर फाये,,मुख्य मार्गदर्शक संदीप बुराडे उपस्थिती होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.