Home Social शासकीय रुग्णालय नागपूर येथे मतिमंद,अपंग,प्रमाणपत्र बनवून देण्याचे सहकार्य समशेर पुरवले,गणेश भालेकर यांनी...

शासकीय रुग्णालय नागपूर येथे मतिमंद,अपंग,प्रमाणपत्र बनवून देण्याचे सहकार्य समशेर पुरवले,गणेश भालेकर यांनी केले.

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी‌ 

         कन्हान:- एम.जी.एस.संविधानिक हक्क संघटन कन्हान नगरपरिषद अध्यक्षा सौ.करुणाताई अष्टनकर यांच्या नेतृत्वाखाली आज मंगलवार शासकीय रुग्णालय नागपूर येथे अपंग,मतिमंद दिव्यांगाना प्रमाणपत्र बनवून देण्याचे कार्य करण्यात आले.

         समशेर पुरवले,गणेश भालेकर यांच्या साहाय्याने शासकीय रुग्णालय नागपूर येथे मतिमंद,अपंग प्रमाणपत्र बनवून देण्यात आले.

       बाळकृष्ण देशमुख रा. निलज ( पारशिवनी) वकलकर रा.वाघधरे वाडी,मोनिका उफाडे रा. विष्णू लक्ष्मी नगर,कुंदन शेंडे रा.वाघरेवाडी,सतीश शेंडे रा. वाघधरेवाडी या सर्व लाभार्थ्यांना प्रमाणपत्र मिळवून देण्याचे कार्य एम.जी.एस.संविधानिक हक्क संघटन यांच्या साहाय्याने व तसेच कन्हान नगर परिषद अध्यक्ष करुणाताई अष्टनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय रुग्णालय नागपूर येथे करण्यात आले.