ईव्हीएम मशीन हटवून मतपत्रिका द्वारा निवडणूक घ्यावी.. — अप्पर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत,”केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांना,”जागतिक मानवाधिकार संघटना चिमूर पदाधिकाऱ्यांद्वारे निवेदन.. — ईव्हीएम मशीन द्वारा निवडणूक घेतल्यास शासन-प्रशासन जबाबदार..

दामोधर रामटेके

कार्यकारी संपादक

         ईव्हीएम मशीन द्वारा होणाऱ्या निवडणुका या विश्वासार्ह,भयमुक्त,पारदर्शक होत नाही.याचबरोबर मताधिकार सारख्या महत्त्वपूर्ण मुलभूत अधिकारांचे हनन होते आहे.

         यामुळे ईव्हीएम मशीन ऐवजी मतपत्रिका द्वारा पुढील सर्व निवडणूका घेण्यात याव्यात यासाठी,”चिमूर तालुका जागतिक मानवाधिकार संघटना पदाधिकाऱ्यांद्वारे,”अप्पर जिल्हाधिकारी किशोर घाडगे यांच्या मार्फत केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त नवी दिल्ली यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

        निवेदनात म्हटले आहे की, ईव्हीएम मशीन द्वारा होणाऱ्या निवडणुका या मत व्यक्त करीत नाही आणि मताचे प्रत्यक्ष दर्शन घडवित नाही.मतदार नेमके कुणाला मत देतो हे ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून स्पष्ट होत नाही आणि मतदारांनी ज्या उमेदवारांना मत दिले आहे त्या बाबत सुध्दा खात्री होत नाही.

          यामुळे ईव्हीएम मशीन द्वारा होणाऱ्या निवडणुका विश्वसनीय आणि पारदर्शक होत नाही असे निवेदन कर्ता पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

         याचबरोबर निवेदन कर्ता पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की २०२४ ची लोकसभा निवडणुक व पुढील सर्व निवडणूका या मतपत्रिका द्वारा घेण्यात याव्यात.आमच्या मताचे रक्षण करण्यासाठी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांनी हलगर्जीपणा दाखवून दुर्लक्ष केले तर पुढील होणाऱ्या अधिकार व हक्क प्रभावित गंभीर परिणामांना ते स्वतः जबाबदार राहतील.

       निवेदन देताना जागतिक मानवाधिकार संघटना चिमूर तालुका अध्यक्ष किशोर अंबादे,सचिव शिध्दार्थ चहांदे,सहसचिव एकनाथ गोंगले,उपाध्यक्ष उध्दव डेकाटे,पदाधिकारी मिलिंद सोंडवले,दिगांबर बोरकर,आदी पदाधिकारी उपस्थित होते.