आपण आपल्या मुलांना शाळेत दररोज प्रतिज्ञा घ्यायला सांगतो, ती आशि की, “भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, या देशातील विविध परंपराचा मला अभिमान आहे, त्या परंपराचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन, माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखे न, त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्यसमावलेले आहे.”
विविधता दोन प्रकारचे आहे, एक नैसर्गिक विविधता आणि दुसरी म्हणजे सामाजिक विविधता, नैसर्गिक विविधतेचे दोन प्रकार एक म्हणजे निर्जीव सृष्टी आणि दुसरी दुसरा प्रकार म्हणजे सजीव सृष्टी, निर्जीव सृष्टी मध्ये डोंगर वृक्ष जमीन शेती पाणी पहाड दगड माती इत्यादी गोष्टी चा समावेश आहे, आणि सजीव सृष्टी मध्ये जीव जंतू, वनस्पती, वृक्ष, झुडपे, पक्षी आणि पक्षांच्या अनेक जाती, पशु आणि पशुंच्या अनेक जाती, आणि मानव, याची मात्र म्हणजे मानवाची एकच जात, ती म्हणजे मानव जात, निसर्गाने वनस्पती पक्षी जंतू प्राणी म्हणजे पशु यांच्यात अनेक जाती निर्माण केल्या परंतु मानवाची मात्र जात एकच ठेवली ती म्हणजे माणूस तो सारखाच सगळी माणसे अवयवाने सारखीच ठेवले, जंतू पक्षी पशु हे मात्र अवयवाने अनेक प्रकारचे बनविले म्हणून त्यांच्यात अनेक जाती निर्माण झाल्या, परंतु माणसांचे अवयव एक सारखेच असल्यामुळे माणसात निसर्गाने अनेक जाती निर्माण केल्या नाहीत,
निसर्गाने माणसात अनेक जाती निर्माण केल्या नाहीत परंतु माणसाने मात्र माणसात अनेक जाती आणि अनेक धर्म आणि अनेक वर्ग मात्र निर्माण केले याला म्हणतात मनुष्यनिर्मित विविधता.
नैसर्गिक विविधतेत निर्जीव आणि सजीव यातील विविधता आणि मानवी विविधतेत सामाजिक विविधता अशा दोन प्रकारच्या विविधता आहेत एक विविधता निसर्गाने निर्माण केली आणि दुसरी विविधता माणसाने निर्माण केली.
निसर्गाची विविधता आणि माणसाची विविधता या दोन्हीची विविधता मिळून जगाची विविधता किंवा देशाची विविधता किंवा एका गावची विविधता दिसून येते.
नैसर्गिक विविधतेपासून माणसाला सुख आनंद समाधान आणि शांती मिळते, म्हणूनच माणूस निसर्ग पाहण्यासाठी सहल काढीत असतो, आणि या सहलीतून तो आनंद आणि शांती मिळवीत असतो. परंतु माणसाने निर्माण केलेल्या विविध रूढी परंपरा म्हणजे जाती धर्म आणि त्यांचे सण वार कार्यक्रम यापासून त्या त्या जातीच्या किंवा धर्माच्या लोकांना नक्कीच आनंद आणि सुख शांती मिळत असावी किंवा मिळते असे समजू या, परंतु विविधतेने नटलेल्या परंपराचा अभिमान बाळगला पाहिजे असे आपण काय करतो ? हा मुख्य विषय चर्चेचा आहे. विविधतेने नटलेल्या परंपराचा आपणास अभिमान आहे की दुराभिमान आहे ? त्याविषयी प्रेम आपुलकी आहे की द्वेष मच्छर आहे ? हे तपासल्यानंतर असे दिसते की, मानवनिर्मित विविधता म्हणजे जाती धर्म आणि त्यांच्या रूढी व परंपरा याविषयी उद्दत पणे विचार करणाऱ्या मोठ्या मनांच्या माणसांमध्ये नक्कीच द्वेष नाही म्हणजे प्रेम आहे परंतु संकुचित विचार करणाऱ्या माणसांमध्ये आपल्या परंपरा शिवाय इतर परंपराचा द्वेष आणि बच्चन आणि तितकारा आहे, आणि आणि हल्ली या 15 वर्षात तर हा द्वेष मत्सर अधिकच वाढलेला दिसतो आहे कारण सरकार याच कारणीभूत आहे, कारण मुलांना आपण रोज विविध परंपरा जपण्याचा त्याबद्दल स्वाभिमान बाळगण्याचा त्यांच्यावर निष्ठा ठेवण्याचा ठेवण्याची शपथ देतो अगदी त्याविरुद्ध आजचे सरकार पावले उचलत आहे, म्हणजेच जाती आणि धार्मिक भावनांना अधिक खतपाणी घालून एकमेकांच्या विरोधात उभे करत आहे, आणि स्वतः सुद्धा धार्मिक कृत्य करीत आहे, खरे तर संविधानानुसार सरकार हे कोणत्याही जातीची किंवा धर्माचे नसते तर ते सर्वच जाती धर्माचे असते, म्हणजेच धर्मनिरपेक्ष असते, किंवा सर्वधर्मसमभाव बाळगणारे असावे आणि तशीच सरकारने सर्वच धर्माच्या लोकांना वागणूक द्यावी अशी अपेक्षा संविधानाने केलेली आहे, संविधानाने धार्मिक स्वातंत्र्य दिले असले तरी, त्या स्वातंत्र्याच गैरवापर कोणी करू नये यासाठी सरकारचे नियंत्रण त्यावर ठेवलेले आहे, परंतु सरकारच जर धर्मनिरपेक्षतेचे संविधानाचे नियम पाळत नसेल तर विविधतेने नटलेल्या परंपराचा सगळ्यांना अभिमान कसा राहील ? त्या परंपरा विषयीचे प्रेम कसे राहील? बंधुभाव कसा निर्माण होईल? सामाजिक समता किंवा समरसता शक्य असेल का? समानता आणि दर्जाची समानता येणे शक्य असेल का? असे प्रश्न प्रामाणिक विचारवंतांना नक्कीच पडतात.
नैसर्गिक विविधतेचा आनंद नक्कीच घेता येतो, तसा मानवनिर्मित विविधतेचा म्हणजे विविध परंपराचा आनंद घेता येतो का ? आणि तो कसा घ्यायचा ? कारण का कारण प्रत्येक धर्माचे जातीचे विचार तत्त्व आचरण नियमावली ह्या अलग अलग आहेत, त्यात सारखेपणा नाही, याशिवाय माझीच जात श्रेष्ठ आणि दुसऱ्याची कनिष्ठ, म्हणून आम्हीच श्रेष्ठ आणि इतर कनिष्ठ, अशी भावना ह्या मानवनिर्मित विविध परंपरामुळे म्हणजेच मानवनिर्मित विविधतेत निर्माण होत असते, म्हणून मानवनिर्मित ही विविधता ही माणसालाच दुःखदायी क्लेशदायी त्रासदायक ठरले ली आहे, ती तिने एवढे टोक गाठले आहे की, ह्या विविध परंपरा या एकमेका एकमेकांची जीव घेण्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, जातीच्या आणि धर्माच्या नावाने दरवर्षी माणसांची किती मूडदे पडतात, किती मनुष्यहानी होते, मालमत्तेची किती नुकसान होते, याचा सर्वे जर केला तर गेल्या दहा-वीस वर्षाचा जरी सर्वे केला तरी एक भयानक चित्र आपल्यासमोर उभे राहते. आणि वाटते की मनुष्य निर्मिती विविधता परंपरा ही मानवहित कार्य नसून माणसाच्या जीवावरच उठलेली आहे की काय ? असे असताना मानवनिर्मित विविधता नष्ट करून किंवा विविधतेत एकता पाहण्याचे स्वप्न हे केवळ स्वप्नच ठरले असून, हा अनुभव असताना, परत या परंपराचा अभिमान बाळगण्याची शपथ मुलांना का द्यावी ? असा प्रश्न पडतो. यापेक्षा मानवनिर्मित विविधता नष्ट करूया, आणि ” मानवनिर्मित विविधता नष्ट करून आपण सारे एक बनू आणि नेक बनू, आणि सारे जण सुखाने आनंदाने समाधानाने आणि शांतीचे जीवन जगू, आयुष्याचे जीवन जगू “अशी शपथ मुलांना दररोज का देण्यात येऊ नये ? असा प्रश्न मी सामान्य असलेल्या सामान्य बुद्धीच्या लोकांना या लेखाद्वारे करीत आहे. आणि अशक्य असे हे काही नाही, कारण माणसानेच जाती धर्म आणि त्यांच्या रूढी परंपरा निर्माण केलेल्या असतील नवे आहेतच तर मग माणूसच या नष्ट करू शकतो, फक्त त्याच्या मनाची आणि बुद्धीची तयारी असली पाहिजे. प्रत्येक माणसाच्या मनाची आणि बुद्धीची ही तयारी करण्यासाठी आधी या विषयाकडे गंभीरपणे आणि सहानुभूती ने पाहण्याची गरज आहे, नैसर्गिक विविधता जशी आहे तशी आपण सामाजिक विविधता ठेवता कामा नये कारण नैसर्गिक विविधते चा माणसाला फायदा आहे किंवा ती उपयोगाची आहे परंतु मानवी विविधता ही माणसाच्या जीवाशी खेळणारी आहे माणसासाठी ती निरुपयोगी आहे, मानवनिर्मित विविधता ही माणसाला माणसापासून दूर करणारी आहे, एकसंघ समाजाला धोकादायक आहे, एकसंघ भारतीय समाजाचे तुकडे करणारे आहे, अखंड भारताचे तुकडे करणारी ही संकल्पना आहे, म्हणून या मानवनिर्मित विविधतेचा अभिमान बाळगण्याची गरज नाही, तिच्याशी निष्ठा ठेवण्याची गरज नाही, परंपरा पाळण्याची गरज नाही, कारण कोणत्याही जातीच्या किंवा धर्माच्या रूढी आणि परंपरा असो या रूढी आणि परंपरा माणसाला माणसाच्या जवळ नेणाऱ्या नसून माणसाला माणसापासून दूर करणाऱ्या आणि एक संघ समाजापासून एक समूह म्हणून पालक करणाऱ्या या परंपरा आहेत, या रूढी आणि परंपरा केवळ परंपराच न राहता कर्मकांड बनलेले आहे त. त्या कर्मकांड बनून माणसांचे आर्थिक नुकसान पण करीत आहेत, ज्या कर्मकांडापासून माणसाला काडीचाही उपयोग नाही उलट आर्थिक नुकसान आहे शिवाय या सर्व रूढी परंपरा सणवार या अंधश्रद्धा जोपासण्याचे काम करतात, आणि अंधश्रद्धा ह्या माणसाच्या प्रगतीला अडसर ठरतात, माणसाच्या बुद्धीला कुलूप घालतात. माणसाची बुद्धी कुंठीत करतात. माणसाची बुद्धी प्रवाही होऊ देत नाहीत. विचार करण्याच्या प्रवाहास बांधतात, पाण्याच्या प्रवाहास बांधल्यामुळे पाणी साचून राहते आणि त्यात जंतू निर्माण होऊन त्या पाण्यास दुर्गंध येतो त्याप्रमाणे ह्या विविध परंपरा परंपरांचे झाले आहे. साचलेल्या पाण्यात मानवी जीवनास हानी पोहोचतील असे जंतू निर्माण होतात तसे विचार प्रवाह कुंडीत झाले की विचार रुपी या पाण्यामध्ये पण मानव आणि चे जंतू निर्माण झालेले आहेत. याचा वेळीच आपण विचार जर नाही केला तर अखिल मानव जात नक्कीच नष्ट होणार आहे. जसे पर्यावरण बिघडल्यामुळे वनस्पतीतील काही स्पेसिज आणि प्राण्यातील सुद्धा काही प्राणी नामशेष झालेले आहेत तसेच या पृथ्वीतलावरून मानव ही जात नष्ट होणार आहे. हा धोका आता फार दूर नाही, म्हणून विविधतेत एकता शोधण्या ऐवजी एकतेत विविधता शोधली पाहिजे.
लेखक : दत्ता तुमवाड
सत्यशोधक समाज नांदेड
दिनांक : 13 डिसेंबर 2025. फोन : 9420912209.



