बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
नीरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथील लक्ष्मी नरसिंह विकास आराखड्या आतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला अचानक दीड वर्षापासून ब्रेक लागल्याने स्थानिक भाविक व पर्यटक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मागील काही वर्षापासून सुरू असलेल्या या योजनेमुळे पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा नागरिकांना होती, मात्र काम बंद पडल्यामुळे योजना रखडली आहे.
लक्ष्मी नरसिंहाचे भाविक व ग्रामस्थ यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंजूर निधी असून सुद्धा काम थांबवण्यात आले आहे . काम अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांना पुन्हा पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक रहिवासी विद्यमान सरपंच नितीन सरवदे म्हणाले की, “सुरुवातीला काम वेगाने सुरू झाल्याने आम्हाला दिलासा वाटला होता, पण आता अचानक दीड वर्षापासून काम थांबल्याने या योजनेद्वारे गावाला पिण्यासाठी पाणी मिळणार केव्हा. नाहीतर आसाच धुळखात पाणीपुरवठा पडणार का. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.” अन्यथा पाणीपुरवठा न चालू झाल्यास संपूर्ण गावच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. सरपंच नितीन सरवदे यांचे उदगार.
यासंदर्भात मीडिया द्वारे तालुका बांधकाम अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, मेसेज करा म्हणून असा मोकळ्यात रिप्लाय आलेला आहे. फोन धोनी द्वारे संपर्क साधता असता फोन उचललेला नाही.
कामाला काही तांत्रिक अडचणी आणि निधी प्रक्रियेमुळे कामाला विलंब झाला आहे का. तीर्थक्षेत्र आराखड्यातील निधी असून सुद्धा कामाला ब्रेक आहे. या भागात आराखड्यातील पाणीपुरवठ्या संदर्भात सर्व ठिकाणी चर्चा होऊ लागलेली आहे. लवकरच काम सुरू करून स्वच्छ पिण्यासाठी पाण्याची सोय करावी अशी या गावच्या विद्यमान सरपंच नितीन सरवदे व गावातील ग्रामस्थाच्या वतीने मागणी होत आहे.
पाणीपुरवठा योजनेचे बंद पडलेले काम प्रशासनाने तातडीने सुरू करावे असी मागणी केली आहे , वेळेत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिलेला आहे.
चौकट…
पाणीपुरवठा योजनेचे काम दीड वर्षापासून अचानक बंद का?
निधी वितरित असून सुद्धा ठेकेदाराचा मनमानी कारभार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पाणीपुरवठ्याचे बंद असलेले काम चालू करण्यात यावे.
नरसिंहपूर नागरिकांमध्ये याबद्दल नाराजी होत असून, काम चालू न झाल्यास इथून पुढे आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. लवकरच तातडीने काम सुरू करण्यासाठी ग्रामस्थांची मागणी आहे.



