दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : पुणे जिल्ह्यातील एकूण 14 नगरपरिषद व तीन नगरपंचायती यांची सार्वत्रिक निवडणूक प्रस्तावित सार्वत्रिक निवडणुकीकरिता 8 ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात होती, या प्रारुप यादीच्या अनुषंगाने 13 ऑक्टोबर 2025 पर्यंत सूचना व हरकती स्वीकारण्यात येणार होत्या.
तथापि राज्य निवडणूक आयोगाने सूचना व हरकती स्वीकारण्याची मुदत 17 ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. तरी नागरिकांनी आपल्या सूचना व व हरकती सादर करण्याचे आवाहन नगरपालिका शाखेचे प्रशासकीय अधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी केले आहे.
नागरिकांनी प्राप्त झालेल्या सूचना व हरकती यांचा विचार करून दिनांक 31 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तरी नागरिकांच्या सूचना व हरकती संबंधित नगरपरिषद व नगरपंचायत कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहेत. अशी माहिती श्री. दुर्वास यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.



