वाघाची मुजोरी रत्यावरच मांडतो ठा्ण… — प्रवाशांची उडते तारांबळ.. — वाघ बघायचं आहे तर चला मग आरमोरी – वैरागड मार्गावर…

ऋषी सहारे

संपादक

        आरमोरी- वाघ म्हटल की अंगावर शहारे उठतात पण जिवंत वाघ समोर येतात तेव्हा..

तारांबळ उडणार की जीव मुठीत घेऊन पळणार ..

असे अनेक प्रसंग सध्या आरमोरी परिसरात घडत आहेत त्यातीलच एक काल परवाच प्रसंग.

             एकेकाळी नक्षलवाद्यांची दहशत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आता वाघ आणि रानटी हत्तीची दहशत वाढत आहे. असाच एक प्रसंग सोमवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास आरमोरी – रामाळा- वैरागड मार्गावर प्रवाशांना अनुभवायला मिळाला. या मार्गावर चक्क एका वाघाने ठिय्या मांडल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. काही वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील वडसा वन वीभागात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या परिसरात मानव वन्यजीव संघर्षदेखील वाढला आहे.

             अशात रस्त्यावर वाघाचे दर्शन होणे सामान्य बाब झाली आहे. सोमवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास वैरागड – रामाळा-आरमोरी मार्गावर एका वाघाने बराच वेळ ठिय्या मांडल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. हा प्रसंग यातील काही प्रवाशांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपला. यात तो वाघ रस्त्यावरून चालताना दिसून येत आहे. याच परिसरात काही दिवसांपूर्वी वाघाची जोडीला अनेकांनी पाहिले होते. हा त्यातीलच एक असल्याचे बोलल्या जात आहे. या मार्गावरून जाणाऱ्या प्रवशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.