आळंदी ग्रामीण रुग्णालयात’आयुष्मान भव:’ मोहीमचा शुभारंभ…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक 

पुणे विभागीय 

आळंदी : देशभरात 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत ‘आयुष्मान भव:’ मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे करण्यात आला असून राज्यस्तरावर या मोहिमेचा कार्यारंभ सोहळा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आला याच अनुषंगाने या मोहिमेचा शुभारंभ आळंदी ग्रामीण रुग्णालयात सुध्दा करण्यात आला आहे.

          यावेळी आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.उर्मिला शिंदे यांनी शुभारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना सांगितले की या मोहिमेच्या माध्यमातून सर्व सामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवा पुरविणे व जनजागृती करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. मोहिमेदरम्यान आयुष्मान आपल्या दारी 3.0, आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी, रक्तदान मोहिम, अयवयदान जागृती मोहिम, स्वच्छता मोहिम, वय वर्ष 18 वरील पुरूषांची आरोग्य तपासणी मोहिम उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर दरम्यान ‘आयुष्मान भव:’ सेवा पंधरवाडाही राबविण्यात येईल.

        ‘आयुष्मान आपल्या दारी’ अंतर्गत पात्र लाभार्थींचे आयुष्मान कार्ड नोंदणी व वितरण, स्वयं नोंदणीसाठी जनतेला प्रोत्साहित करणे, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना यांचे संयुक्त कार्डचे वितरण करण्यात येणार आहे. 18 वर्ष व अधिक वयोगटातील पुरूषांची आरोग्यविषयक सर्वंकष तपासणी करण्यात येणार असून ग्रामीण रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालय येथे दर आठवड्याला आरोग्य मेळावा पार पडणार आहे असे ही डॉ.शिंदे यांनी सांगितले.

          यावेळी माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण, पांडुरंग गावडे, सतिश चोरडिया, संकेत वाघमारे, अर्जुन मेदनकर, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, हमीद शेख तसेच ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.