आयुष्यमान भव कार्यक्रमाचे उदघाटन महामहीम राष्ट्रपती दौपदि मृर्मू यांच्या हस्ते विडिओ कॉन्फरन्स व्दारे संपन्न … — आयुष्यमान भव अभियानाचा सर्वांनी लाभ घ्यावा:- आमदार कृष्णा गजबे… — स्वस्थ भारत, समर्थ भारत….!

 

 

ऋषी सहारे

संपादक

 

देसाईगंज:

        केंद्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा महत्वकांक्षी निर्णय सर्व नागरिकांना मिळणार आयुष्यमान भव योजनेचा लाभ.

      आज महामहीम राष्ट्रपती दौपदीजी मृर्मू यांच्या हस्ते विडिओ कॉन्फरन्स द्वारे आयुष्मान भव: आरोग्य सेवा या लोकोपयोगी योजनेचे उद्धाटन सोहळा ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे आमदार कृष्णा गजबे यांच्या उपस्थितीत पार पडला. 

✓ 17 सप्टेंबर 2023 पासून

√ आयुष्यमान आपके द्वार 3.0 च्या अंतर्गत आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा विस्तार.

√ आयुष्यमान मेळा आरोग्य आणि निरोगीपना केंद्रे आणि सामुदायिक आरोग्य केंद्रावर साप्ताहिक आरोग्य मेळाव्याचे यांचे आयोजन. 

√ रक्तदान शिबिराचे आयोजन आणि ऐच्छिक रक्तदानाची संबंधित माहिती. 

√ ऐच्छिक अवयव दानासाठी माहिती आणि प्रतिज्ञा. 

✓ 02 आक्टोंबर 2023 रोजी

√ आयुष्यमान सभेचे आयोजन ज्यामध्ये आयुष्यमान कार्डचे वितरण, आभा आयडी तयार करणे आणि आरोग्य योजनांची माहिती दिली जाईल. 

    आयुष्यमान भव या अभियानाच्या माध्यमातून सर्व गरजु लाभार्थ्यांना आयुष्यमान भव योजने अंतर्गत फिजिशियन सर्जन, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्रचिकित्सक, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ अशा वैद्यकीय तज्ञांचा समावेश असणार आहे. देसाईगंज वडसा येथे ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी या तपासण्या होणार आहेत. तरी या अभियानाचा स्थानिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी मार्गदर्शन करताना केले. 

      यावेळी आमदार कृष्णा गजबे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश मिसार, ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.