Home उपक्रम ग्रामपंचायत पिंपरी बुद्रुक येथे शासन आदेशाप्रमाणे आजादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत दिनांक...

ग्रामपंचायत पिंपरी बुद्रुक येथे शासन आदेशाप्रमाणे आजादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजीचे ध्वजारोहण संपन्न… — दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी चे ध्वजारोहण पिंपरी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच भाग्यश्री बोडके यांच्या हस्ते संपन्न… 

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

      आजादी का अमृत महोत्सवा निमित्त पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील ग्रामपंचायत कार्यालया समोर गावचे विद्यमान सरपंच भाग्यश्री बोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

       यावेळी प्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

     या कार्यक्रमासाठी सरपंच भाग्यश्री बोडके, सरपंच सुदर्शन बोडके, उपसरपंच संतोष सुतार, पोलीस पाटील वर्धमान बोडके, चांगदेव बोडके, व्याकट बोडके, मयुर चौगुले शंकर रणदिवे, भाऊ रणदिवे, ग्राम पंचायत अधिकारी गणेश लंबाते यांची उपस्थिती होती. 

        नरसिंहपुर, टणु ,गिरवी ,गणेशवाडी ,पिंपरी बुद्रुक, गोंदी, लुमेवाडी ,लिंबूडी, ओझरे,आधी सर्व भागातील ग्रामपंचायत कार्यालयात समोर आजादी का अमृत महोत्सवा निमित्त ध्वजारोहण करण्यात आले.

      कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायात सदक्ष ग्राम पंचायत अधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.             

       कार्यक्रमाची सांगता सर्वांना आजादी का अमृत महोत्सवाचे वाचन करा असे सांगून शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.