शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हा चंद्रपूरच्या वरोरा तालुका महासचिवपदी वरोरा तालुक्यातील भास्कर भाऊराव मेश्राम यांची निवड करून त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले.
मेश्राम हे सामाजिक कार्यकर्ते असून या तालुक्यात संघटन बांधणीला अधिकचे बळ मिळणार असल्याचे बोलल्या जाते.
नियुक्तीपत्र देताना महाराष्ट्र प्रदेश महासचिव केशवराव किराणिक, जिल्हा कार्याध्यक्ष आनंदराव किरणकर ,जिल्हाध्यक्ष जनार्दन गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते . मेश्राम यांच्या निवडीबद्दल कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.



