राजस्तरीय स्पर्धेत मुलाच्या भुसावल संघाने मारली बाजी… — आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने राज्‍यस्‍तरीय आमंत्रित हॉकी स्‍पर्धा (मुले)…

 प्रेम गावंडे

  उपसंपादक

दखल न्युज भारत

        चंद्रपूर : आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने चंद्रपुरात थाटात पार पडलेल्‍या ‘आमदार चषक’ राज्‍यस्‍तरीय आमंत्रित हॉकी स्‍पर्धेत मुलांच्या गटात अंतिम सामन्‍यात अमरावती संघाचा 07-04 ने पराभव करीत भुसावल संघाने बाजी मारली.

          हॉकी प्रमोटर असोसिएशन चंद्रपूर व डेव्‍हलपमेंट ॲन्‍ड रिसर्च एज्‍युुकेशन सोसायटी (ड्रिम) चंद्रपूर यांच्या संयुक्‍त विद्यमाने आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने राज्‍यस्‍तरीय आमंत्रित हॉकी स्‍पर्धा (मुले) लोकमान्य टिळक हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, जिल्‍हा स्‍टेडीयमच्‍या बाजूला चंद्रपूर येथे पार पडली. या स्‍पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून मुलाचे संघ सहभागी झाले होते. 

           मुलाच्या गटात भुसावल आणि अमरावती संघात अंतिम सामना रंगला. अतिशय चुरशीच्या सामन्‍यात भुसावल संघाने अमरावती संघाचा 07-04 ने पराभव केला. तर तिसऱ्या स्‍थानी चंद्रपूर संघाने बाजी मारली. 

           मुलांच्या गटात प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्‍या संघाला ट्राफी, रोख आणि मेडल देऊन आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्‍ते सन्‍मानित करण्यात आले. तर उत्‍कृष्ट कामगिरी करणाऱ्या बेस्‍ट स्‍कोरर, बेस्‍ट किपर, बेस्‍ट फॉरवर्ड, बेस्‍ट डिपेंडर, बेस्‍ट प्‍लेअर ऑफ फायनल मॅच, बेस्‍ट प्‍लेअर ऑफ द टुर्नामेंट म्‍हणून खेळाडूंना गौरविण्यात आले. 

           यावेळी अरविंद दिक्षीत, सुरेंद्र अडबाले, प्रा. रवी झाडे, दिनकर अडबाले, सचिन मोहीतकर, प्रेम गावंडे, अभिजीत दुर्गे, निलेश शेंडे रुपेशसिंह चौव्हाण, प्रभाकर टोगर, संध्या टोगर, अमोल सदभैय्ये, पंकज सदभैय्ये, आकाश इंगळे, लोकेश मोहुर्ले, दिनेश सावसागडे, सिद्धार्थ सूर्यवंशी, शुभम पुणेकर, शुभम साखरे, भारत विरुटकर, अपूर्व कुळसंगे, सोनाली गावंडे, आईशा खान, प्रियंका मंडळ, श्रुती भारती, निधी झाडे, समृद्धी गेडाम, शर्वरी लाभणे, करिष्मा राजपूत, दिक्षा चुनारकर आदींची उपस्‍थिती होती.