उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
चिमूर विधानसभा मतदारसंघातंर्गत चिमूर व नागभिड नगरपरिषदेची आणि भिसी नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक अगदी जवळ असल्याने मतदारांसह राजकीय व सामाजिक नेतृत्वाच्या नजरा एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत.
भिसी नगरपंचायत हे बहुधा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या बाजूने राहिली आहे.यावेळी सुध्दा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या बाजूने कौल असेल असा अंदाज नव्हे तर खात्री आहे.
भिसी येथील दुकान चाळीचे बांधकाम पाडणे,लघू दुकानदारांना व व्यवसायीकांना रस्त्यावर आणणे,चहा व नस्ता दुकानदारांची फजीती करणे,शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्ष न करणे,शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव न देणे,शेतकऱ्यांचे कर्ज माफ न करणे आणि प्रशासक काळात सर्वसामान्य नागरिकांचे काम न होणे या विशेष बाबी भाजपाच्या अंगलट येणाऱ्या आहेत.
चिमूर व नागभिड नगरपरिषद विकासाच्या नावाखाली भाजपाकडे होत्या.पण सत्ता काळात पाहिजे तसा निधी आमदार किर्तीकुमार भांगडीया यांना नगरपरिषद चिमूर व नागभिड साठी खेचून आणता आला नाही.
चिमूर वासियांच्या साध्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या त्यांना निकाली काढता आल्या नाही.पण,बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे हा विषय वारंवार पुढे आणला जातो आहे.
आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी आणलेल्या त्या निधीचा उपयोग नागरिकांना होतोय का?हा प्रश्न काळजीपूर्वक विचारात घेणारा आहे.तद्वतच भाजपाच्या सत्ता काळात जातीवादाला अनुसरून कामाला व कार्याला महत्व दिले जाते.यामुळे भाजपाच्या कार्यपद्धतीला मतदार व नागरिक वैतागले असावेत असे वाटते आहे.
एकीकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांना महत्व द्यायचे तर दुसरीकडे त्यांच्या विचारांच्या विरोधात काम करायचे हि निती आमदार किर्तीकुमार भांगडीया यांची दिसून येते आहे.
चिमूर तालुका राष्ट्रसंताची भुमी असल्याने या भुमीतून दारु व अवैध धंदे हद्दपार करणार म्हणणारे आमदार किर्तीकुमार भांगडीया हे दारु बाबत कायमचे चूप झाले आहेत.
उलटपक्षी त्यांच्या कार्यकाळात जिकडे-तिकडे मोठ्या प्रमाणात अवैध व वैध दारु सुरू झाली आहे.इतरही अवैध व्यवसायात वाढ झाली आहे.यामुळे ते गोरगरिब नागरिकांचे रक्षणकर्ता आहेत असे म्हणता येत नाही.
त्यांनी चिमूर जिल्हा व पुर्ण दर्जाचा भिसी तालुका अजूनपर्यंत केला नाही आणि पुढेही करणार नाही.म्हणूनच त्यांच्या शब्दाला केवळ आमदार म्हणून किंमत द्यायची काय?हा प्रश्न चिमूर व भिसी नागरिकांसमोर असणार आहे.
चिमूर,भिसी,नागभिड मध्ये काँग्रेस मित्रपक्ष व भाजपा मित्रपक्ष अशी थेट लढत होणार आहे.पण शिंदे गटाच्या शिवसेना पक्षाची व अजीतदादा पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची इकडे अजिबात तागद नाही.यामुळे भाजपाला स्वतःच्या दमावर निवडणूक लढवावी लागणार आहे,भाजपा त्यासाठी तयारही आहे.
मात्र,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची ताकद स्वबळावर असली तरी वंचित बहुजन आघाडी,रिपाई,शिवसेना (उबाठा),शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या सोबत ते या निवडणुकीत एकत्र दिसणार असल्याने,यांचे पक्ष बलाबल भिसी नरपंचायत व चिमूर आणि नागभिड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांमध्ये यशस्वी होण्यासाठी पुरेसे आहे.
मात्र,निवडणूक म्हटले की रुपये आवश्यक झाले आहेत.राष्ट्रीय कांग्रेस पक्ष,शिवसेना उबाठा,शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,वंचित,रिपाई काय भूमिका घेतात आणि मतदारांना आपल्याकडे कसे वळवतात यावर खेळ असणार आहे.
तसेही चिमूर,भिसी,नागभिड येथे सामान्य नागरिक,गोरगरीब-मजूर नागरिक व शेतकरी राहात असल्याने त्यांना स्वतःच्या परिस्थितीची जाणीव आहे.भाजपाने शेतकऱ्यांच्यासाठी आवश्यक उपाययोजना अजूनही केल्या नाहीत.
तद्वतच विकास करायचा झाल्यास प्रत्येक नागरिकांचा तुलनात्मक विकास व्हायला पाहिजे.तसी निती राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांची असायला हवी.मात्र भाजपा वैयक्तिक स्तरावर नागरिकांच्या विकासाला महत्व देत नाही,हे वास्तव आहे.
तरीपण चिमूर,भिसी,नागभिड येथे होणाऱ्या २ डिसेंबरच्या निवडणुकीत तगडा संघर्ष बघायला मिळणार आहे.
आणि ३ डिसेंबरला आमदार किर्तीकुमार भांगडीया म्हणजे भाजपा कि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष सत्तेवर येणार हे चित्र स्पष्ट असेल…



