शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
काही दिवसांत सोयाबिन कापणीला सुरुवात होणार होती.पण सोयाबिन पिकांवर योलोमोझ्याक रोग आल्याने सोयाबिन पिक हातुन निघून गेले आहे.मागील दोन वर्षांपासून सोयाबिन पिकांवर योलोमोझ्याक व अनेक रोग येत असल्यामुळे सोयाबिन पिक हातुन निघून जात आहे.
नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जातात व आल्या पाऊल्याने वापस जातात पण शेतकऱ्यांचे प्रश्न कोणी सोडवताना दिसत नाही. सर्व लोकप्रतिनिधी म्हणतात काही शेतकरी नेते म्हणून बोलतात व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणीच बोलताना दिसत नाही.
शेतकरी नेते फक्त निवडणूकी पुरते व नावा पुरते काय?सोयाबिन पिक हातुन निघून गेला तर कापूस पिकाचे भाव उतरले आहे.मग सांगा साहेब, शेती करणे गुन्हा आहे काय? असा प्रश्न शेतकरी पुत्र विनोद उमरे यांनी उपस्थित केला आहे.
शेतीच्या खरीप हंगाम सुरु असून, शेतात जाण्या- येण्यासाठी पायपीट करावी लागत असते. वेळोवेळी पांदन रस्त्यांची मागणी केली जाते. मात्र, ते सुद्धा कंत्राटदारांकडून बरोबर बनवून दिले जात नाही.पांदन रस्ते बनवलेच तर बरोबर दबाई केली जात नाही.त्यामुळे अल्पावधीतच हे रस्ते उखडून खराब होत असतात.
चिमूर तालुक्यातील मागील अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील पांदन रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. या रस्त्याने शेतीचे साहित्य देखील नेता येत नाही. फार मोठा त्रास सहन करावा लागतो.
चिमूर तालुक्यातील पांदन रस्त्याचे तात्काळ खडीकरण करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी पुत्र विनोद उमरे यांनी केली आहे. याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने आमदार, खासदार, पालकमंत्री, जिल्हाधिकारी साहेब सांगा ना, साहेब आम्ही शेती करतो तर हा काय गुन्हा आहे, असा प्रश्न शेतकरी नेते विनोद उमरे यांनी उपस्थित केला आहे.
शेतावर जाणाऱ्या पांदन रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. अनेक गावांमध्ये आजही शेतात जाण्यासाठी चिखलातून प्रवास करावा लागतो.



