Home Maharashtra निराधारांना दहा महीन्यापासुन पगार नाही उपासमारीची वेळ, शासनाचे दुर्लक्ष…

निराधारांना दहा महीन्यापासुन पगार नाही उपासमारीची वेळ, शासनाचे दुर्लक्ष…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी…

       चिमूर तालुकांर्गत मौजा नेरी व परिसरातील निराश्रित निराधार म्हाताऱ्यांना गेल्या दहा महिन्यांपासून पगार झाले नाही. त्यामुळे मानधन रुपी देण्यात येणाऱ्या अनुदानापासून वंचित असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

         हे निराश्रित निराधार म्हाताऱ्ये तहसील कार्यालयाचे उंबरठे झिझवित आहे तरी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याचा आरोप होत आहे समजा कर्मचाऱ्यांचे पगार दहा महिन्यांपासून थकीत जर असले तर ते कोणती भूमिका घेतील हे कळायला मार्ग नाही.

           आमचे पगार का रोखण्यात आले आहे असा प्रश्न निराधारांना पडला आहे. या पगाराविषयी आधी न्याय व्हावा अशी मागणी निराधार रेटुन धरत बोलुन व्यक्त करीत आहेत.