Home Vidarbha लोतवाडा कुटासा मुंडगाव शेती रस्त्यावर शेतकऱ्यांच्या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद…

लोतवाडा कुटासा मुंडगाव शेती रस्त्यावर शेतकऱ्यांच्या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद…

युवराज डोंगरे/खल्लार

        उपसंपादक 

      लोतवाडा कुटासा मुंडगाव या शेती रस्त्यावर शेतकऱ्यांनीच अतिक्रमण केल्यामुळे हा रस्ता अरुंद झाला आहे.

       सदर रस्ता शेतीचा रस्ता असून या रस्त्याने 90 टक्के शेतकऱ्यांची शेती असून रस्त्यालगतच काही शेतकऱ्यांनी रस्त्यावर अतिक्रमण करुण पेरणीही केली असून काही शेतकऱ्यांनी तर मोरी खोदून माती रस्त्यावर टाकली तर काही शेतकऱ्यांनी बल्ल्या उभ्या करूण दोरी बांधून रस्त्यावर मोठमोठे बाभूळीचे काटे टाकले असून ते काटे जर चिखलात मिसळून शेतकरी किंवा शेतमजूर यांना पायात रुतले तर पावसाळा भर घरीच बसावे लागेल. प्रसंगी वाद होऊन अनुचित प्रकार घडू शकतो.

       तहसिलदार यांनी या रस्त्याची मोजनी करूण हा रस्ता जेवढा फुट रुंदी असेल तेवढेच शेतकऱ्यांनी रस्त्यावर केलेले काट्यांचे व पिकाचे अतिक्रमण काढून लोतवाडा येथिल शेतकरी व शेतमजूर यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.