आमडी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष राबविण्यावर भर… — ” शेत तिथे पौष्टिक तृणधान्य, मोहीमे अंतर्गत महीला शेतकऱ्यांना बियाणे वाटप..

 

कमलसिंह यादव 

  प्रतिनिधी

 

 पारशिवनी :- महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत पारशिवनी तालुका क्रर्षी अधिकारी सुरज शेडे यांचे मार्ग दर्शनात आज दिनांक 12/07/2023 रोजी मौजा – आमडी ग्राम पंचायत येथे ग्राम पंचायत आमडी येथे सरपंचा शुभांगी भोस्कर च्या अध्यक्षेत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 ” शेत तिथे पौष्टिक तृणधान्य मोहीम” अंतर्गत कृर्षी सहायक राठौड मॅडम यानी तृणधान्याचे महत्त्व सांगून ज्वारी, बाजरी, राळा इ. मिनि किट बियाणे वाटप करण्यात आले..तसेच मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड योजना, PMFME, MAHA DBT पोर्टल वरील कृषी विभागाच्या योजना इत्यादी विषयी सविस्तर माहिती देऊन चर्चा करण्यात आली..

      या प्रसंगी आमडी ग्रामपंचायत च्या सरपंच सौ. शुभांगीताई भोस्कर, ग्रा.प. सदस्या सौ. शीलाताई सोनवणे, कृषी सहाय्यक कु. राठोड व महिला बचत गटा ची शेतकरी महिला व गावकरी शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होत्या..