Home Maharashtra कोटगाव ग्रामपंचायत अंतर्गत रस्त्यांवर येणारे घरे पाडायची काय? — स्वच्छतेत दक्ष...

कोटगाव ग्रामपंचायत अंतर्गत रस्त्यांवर येणारे घरे पाडायची काय? — स्वच्छतेत दक्ष ग्रामपंचायत!.. — “माझा गाव आणि माझ्या गावातील समस्या,एक वास्तव?….

प्रदीप रामटेके 

 मुख्य संपादक 

        ग्रामीण भागातील गावात रस्त्यांची आणि नल्यांची समस्या मोठ्या प्रमाणात आहे,याला अपवादात्मक चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा कोटगाव गट-ग्रामपंचायत सुध्दा नाही.

          मात्र,पावसाळा आला की,,गावातील “स्वच्छ रस्ते आणि स्वच्छ नाल्या,असल्या पाहिजे याकडे कटाक्षाने कोटगाव गटग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे आवर्जून लक्ष असते.म्हणूनच पावसाळा जवळ आला की दरवर्षी नाल्यांची सफाई करण्यावर कोटगाव ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा भर असतोय.

       ग्रामपंचायत अंतर्गत गावातील नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात सांडपाण्याचा आणि नाल्यातंर्गत गंदगीचा त्रास होणार नाही याची काळजी मौजा कोटगाव गटग्रामपंचायतचे पदाधिकारी दरवर्षी आवर्जून घेत असतात,हे वास्तव आहे.

         परंतु मौजा कोटगावसह महाराष्ट्र राज्यांतर्गत गाव खेड्यातील प्रत्येक रस्ते योग्य व सिमेंट काँक्रिटचे मजबूत असतील असेही नाही.यामुळे मौजा कोटगाव सह महाराष्ट्र राज्यांतर्गत गावातील काही भागात थोडीतरी दलदल पावसाळ्यात असते हे नाकारता येत नाही..

        याला जबाबदार कोण? हा प्रश्न विचारला तर गावातील नागरिक,ग्रामपंचायत पदाधिकारी,केंद्र व महाराष्ट्र सरकार असे उत्तर पुढे येईल.

           पण,गावखेड्यात लोकसंख्येला अनुसरून रहदारी करण्यासाठी जागा कमी पडत असल्याने बऱ्याच नागरिकांनी स्वतःची घरे रस्त्यावर बांधलेली आहेत,असा प्रकार कोटगाव गटग्रामपंचायत अंतर्गत सुध्दा आहे.तद्वतच कोटगाव गटग्रामपंचायत अंतर्गत नाल्यांवर कच्चे स्नानगृहे सुध्दा तयार केलेली आहेत.

         नाल्यांची स्वच्छता करताना कच्चे स्नानगृहे आणि रस्त्यावर बांधलेली घरे नेहमी आडकाठी आणतात हे सुद्धा तितकेच खरे आहे..

         कोटगाव ग्रामपंचायत पदाधिकारी प्रत्येक नाल्यांच्या स्वच्छतेला महत्व देत असताना नागरिकांनी सुध्दा त्यांच्या योग्य भुमिकेला आणि कार्यपद्धतीला सहकार्य केले पाहिजे.तात्पुरते स्नानगृहे हे नाल्यांची सफाई करताना अळचण निर्माण करणार नाही याकडे संबंधित नागरिकांनी लक्ष दिले पाहिजे व नाल्यांची सफाई करुन घेतली पाहिजे.

         तद्वतच रस्त्यावर ज्यांनी घरांची बांधकामे केली आहेत तेच नागरिक नाल्यांच्या बांधकामांना विरोध करतात हे वास्तव सुध्दा कोटगाव ग्रामपंचायत अंतर्गत आहे.

          मग? नाल्यांची स्वच्छता करण्यासाठी अकारण बोंबाबोंब ठोकण्याचा,अशा नागरिकांना कोणता अधिकार आहे? हा मुद्दा तितकाच महत्वाचा!..

           प्रश्न पडतो की,ग्रामपंचायत पदाधिकारी असताना रस्त्यावर स्वतःच्या घरांचे बांधकाम तात्कालीन पदाधिकाऱ्यांनी केली आहेत.कुठल्या नियमानुसार त्यांनी घरांचे बांधकाम रस्त्यावर केलीत? त्यांनी घर बांधकाम करताना नियमाला महत्व का म्हणून दिले नाही? त्यांनी स्वतःच्या घराजवळून नाल्यांची बांधकामे का म्हणून केली नाहीत? किंवा का म्हणून स्वतःच्या घराजवळून नाल्यांची बांधकामे करु देत नाही? का म्हणून सदर व्यक्तींनी नाल्यांची बुजाई केली?..

         अवास्तव बोंबाबोंब ठोकणे हा अनेकांचा एक स्वभाव गुणधर्म आहे.त्या स्वभावाला औषध राहात नाही.

          मात्र,मागिल ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराला चालना कोणी दिली? गावातील नागरिकांनी त्यांचा भ्रष्टाचार का म्हणून खपवून घेतलाय? मागील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी कागदोपत्री कामे झाल्याचे का म्हणून दाखविले? गावातील नागरिक तेव्हा गप्प का म्हणून राहिले? गावातील नागरिक संबंध नसलेले चेहरे पाहून विरोध करतात काय? आणि संबंध असलेले चेहरे पाहून चूप बसतात काय? असे अनेक प्रश्न समोर आहेत…

           मौजा कोटगाव ग्रामपंचायत येथील रहिवासी असल्याने तेथील नागरिकांच्या कर्तव्य हालचाली,नागरिकांची कर्तव्य मने,नागरिकांचा कर्तव्य कार्यभाग,सखोल जाणतो आहे…

         गावखेड्यात काही लोक आग लावून देतात आणि चूप बसतात,”ते कुचपटी म्हणून काम करतात व पुढच्यांची नेहमी मजा लुटतात.असे कुचपटी विना माचिसच्या काळीने आग नेहमी लावत असतात.”ज्याचे महत्व समाजात नाही आणि कुठेही नाही!…

         सध्या स्थित कोटगाव ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी नाल्यांच्या स्वच्छतेला महत्व देत नाल्यांची सफाई केली व सुरू आहे.हि नाल्यांची सफाई नियमानुसार आणि शासनाच्या धोरणानुसार केली जात आहे.असे असताना व्यक्ती विरोध म्हणून कर्तव्यदक्ष ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा विरोध स्वतःच्या फायद्यासाठी केला जातोय,याला काय म्हणावे?

            प्रश्न हाही निर्माण होतो की,रस्त्यावर आलेली घरे गाव विकासाला खोळंबा निर्माण करतात,म्हणून त्यांची घरे पाडण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मासिक सभेत ठराव घ्यावे व तो कारवाई ठराव जिल्हाधिकारी चंद्रपूर,उपविभागीय अधिकारी चिमूर,तहसीलदार चिमूर,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर,गट विकास अधिकारी चिमूर यांना पाठवायचे काय?

          याचबरोबर श्री.उपक्षम रामटेके एक कर्तव्यदक्ष ग्रामपंचायत सदस्य आहेत.ते नेहमीच लोकहितासाठी धडपडतात.साधे ग्रामपंचायत सदस्य असतांना लोकहितांची कामे विविध कार्यालयातून निकाली काढतात.

       तद्वतच ग्रामपंचायत निवडणूक पुढील वर्षाच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे.या ग्रामपंचायत निवडणूकीत ते लोकप्रतिनिधी म्हणून उभे राहू नये यासाठी त्यांना बदनाम करण्याची चाल विरोधकांची असू शकते…

          पण,गावातील नागरिक हे एकमेकांसी संबंधित असतात,एकमेकांना सुखदुःखात सहकार्य करतात,हे सत्य समजले तर गावविकासातील अळचणी सहज सोडविल्या जातात,या वास्तव्यालाही नाकारता येत नाही.मात्र रुसव्या-फुगव्याला आणि स्व अहंकाराला दूर ठेवले पाहिजे…

          ग्रामपंचायत अंतर्गत नाल्यांची सफाई करताना गावातील नागरिकांचा सर्व प्रकारचा रोष हा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर काढण्याची कार्यपद्धत जुनीच आहे… याला कोणती मानसिकता जबाबदार आहे हे गावकऱ्यांनांच माहिती..

           मात्र,हाच माझा गाव,”ग्राम स्वच्छता अभियानात पुरस्कार पटकावलेला,”एक पाणवठा एक गाव,अंतर्गत सुध्दा पुरस्कार जिंकलेला… माझ्या गावातील नागरिक सर्वधर्मसमभावाने वागणारे,भेदभाव न करणारे, एकमेकांच्या कार्यक्रमात सहभागी होणारे,सहकार्य करणारे,यामुळेच येथील नागरिकांना कुणाच्या वाईट विचारांची नजर न लागो!…