वि. सा. संघ शाखेची काव्यमैफल…

   चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधि भंडारा 

लाखनि:-विदर्भ साहित्य संघ शाखा लाखनीचे गुढीपाडव्याचे ‘ वासंतिक कविसंमेलन ‘ समर्थ विद्यालय लाखनी येथे गुढीपाडव्याच्या शुभ‌मुहूर्तावर उत्साहात पार पडले. कविसंमेलनाचे हे ४७ वे वर्ष होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवमित्री सौ शिवानीताई काटकर होत्या.

        उद्घाटन ज्येष्ठ कवी बाबुरावजी निखाडे यांनी केले. अतिथी म्हणून समर्थ विद्यालयाचे प्राचार्य अनिलजी बडवाईक व शाखेचे अध्यक्ष ह. रा.मोहतुरे मंचावर विराजमान होते. शाखेतर्फे अतिथींचा शाल व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कविसंमेलनात भंडारा गोंदिया, नागपूर व चंद्रपूर जिल्हयातील कवी सह‌भागी झाले होते.

        कविसंमेलनाची सुरुवात कु. श्रेया काडगाये हीने कुंकू या कवितेने केली. ती म्हणते कुंकू हे सौभाग्याचे लक्षण आहे,कुणावर ठेऊ कुंकवाची आशा? असा प्रश्न कवितेतून उपस्थित केला. कु. समीक्षा कांबळे हीने माझ्या भराठी भाषेचा मला अभिमान आहे हे सांगितले.

         ज्येष्ठ कवी आकाश भैसारे, नागोराव सोनकुसरे, हरिभाऊ, मोहतुरे यांनी नववर्षाच्या गुढया उभारल्या तर बाबुराव निखाडे यांनी नववर्ष सुखाचे जावो’ ही कविता सादर करून नवीन वर्षाच्या शू दिल्या. २०१४ हे वर्ष मतदानाचे असल्याने डॉ. अल्काताई सोरदे व सारिकाताई दोनोडे यांनी आपल्या कवितेतून मतदारांना मतदान करायाचे आवाहन केले. चंद्रहास खंदारे, मनिषा टिचकुले, गुंजन टिचकुले यांनी निसर्गवर्णपर कविता सादर केल्या. संजयजी वनवे व ज्येष्ठ कवी गणेशजी कुंभारे यांनी जाणता राजा शिवाजी महाराजांच्या जीवनावर दर्जेदार कविता सादर केल्या.

          मानसी टिचकुले,यशोदा कुंभारकर, ललीतकुमार तिरपुडे यांनी जीवनविषयक कविता सादर केल्या. पालिकचंद बिसने यांनी लाखनी वर तर दुर्गा अतकारी यांनी मुंबई शहराची महती गाईली. प्राचार्य अर्चनाताई सारवे व भावना लिचडे यांनी हिंदी कविता सादर केल्या. ज्ञानेश्वर नेवारे व शिवानीताई काटकर यांनी शेतकरी व त्यांचे दैवत ढवळ्या पवळ्या यावर कविता सादर केल्या. समर्थ महाविद्यालय व जि.प. गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

        प्रास्ताविक ज्येष्ठ गझलकार प्राचार्य प्र. सी. सोनेवाने, आभारप्रदर्शन शाखा उपाध्यक्ष ज्ञा. म.नेवारे यांनी केले. प्रमुख अतिथी प्राचार्य अनीलजी बडवाईक यांनी मार्गदर्शन केले. सौ सारिकाताई दोनोडे यांनी उत्तम संचालन केले. शाखा सहसचिव अक्षयकुमार मासुरकर, प्रा. अजिंक्य भांडारकर यांनी उत्तम सहकार्य केले.