Home Social शिंगणापूर येथे केंद्र स्तरिय लिडर माताचे उद्धबोधन वर्ग संपन्न….

शिंगणापूर येथे केंद्र स्तरिय लिडर माताचे उद्धबोधन वर्ग संपन्न….

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक 

        निपुण भारत अभियानांतर्गत शिंगणापूर केंद्रातील सर्व शाळा मधिल वर्ग 1 ते 3 मधिल पाल्यांच्या मातापैकी लिडर मातांचा उद्बोधन वर्ग जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा शिंगणापूर येथे नुकताच घेण्यात आला.

        या उद्बोधन वर्गाला शिक्षण विस्तार अधिकारी नंदकुमार जाधव, शिंगणापूरचे केंद्रप्रमुख राजेंद्र मालोकार, निपुण भारत अभियानचे राज्य समन्वयक सुनिल इंगळे,दर्यापूरचे गटसमन्वयक सुनिल स्वर्गीय, मुख्याध्यापिका कु. शिलाताई आठवले(जामनिक),दारापूरचे मुख्याध्यापक साबीर शहा यांचे मार्गदर्शन लाभले.

          कार्यक्रमाला तज्ञ मार्गदर्शक कु. प्रणिता कराळे व सौ.चंचला घाटे यांनी लिडरमातांच्या उद्बोधन वर्गाला शासन निर्णयानुसार योग्य मार्गदर्शन केले शेवटी लिडरमातांचे खेळ घेण्यात आले. कार्यक्रमाचा शेवट सर्वांचे आभार मानून उद्बोधन वर्गाची सांगता करण्यात आली.