शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
पळसगाव वनपरिक्षेत्रातंर्गत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी धडक कामगिरी करून वन्यजिवांची शिकार करणाऱ्या पती पत्नीला ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई बुधवारी (दि.12) पळसगाव वनपरीक्षेत्रात करण्यात आली.या प्रकरणी श्री. कालू इंदल राठोड (35), व त्याची पत्नी सौ.बबिता गजानन सोलकी वय (28) दोन्ही रा.अकोली,ता.सेलू,जि.वर्धा असे अटक केलेल्या आरोपींची नावे असल्याचे सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीच्याआधारे,उपक्षेत्र पळसगाव नियत क्षेत्र पारणा कक्ष क्र. 231 मध्ये दुपारी 12 वाजताच्या दरम्यान सामूहिक रित्या गस्तकरीत असताना दोन संशयास्पद रित्या इसम फिरत असताना आढळून आल्याने त्यांची तपासणी केली.
त्यांच्याकडे एक नर आणि एक मादी असे दोन उद मांजर मसण्या उद वन्यजीव मृत अवस्थेत दिसून आल्याने त्यांची पुढील चौकशी करिता पळसगाव (पिपर्डा) येथील वनपरीक्षेत्र कार्यालयात आणण्यात आले.
त्यांच्याकडील दोन उद मांजर मृत या वन्यजीवांसह दुचाकी व इतर साहित्य,असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान डॉ.पोचलवार यांनी त्या वन्यप्राण्यांचे शवविच्छेदन करून दहन केले.आरोपींकडून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एमएच.32.एक्यू.9470 क्रमांकाची दुचाकी,कुऱ्हाड असा मुद्देमाल जप्त केला आहे.
या दोन्ही आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1927 व 1972 चे कलम 26 ड अन्वये गुन्ह्याची नोंद घेत त्यांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई चंद्रपूर उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक, सहायक वनसरक्षक साईतन्मय दुबे,यांच्या मार्गदर्शनात पळसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी योगिता आत्राम यांच्या उपस्थितीमध्ये वनपाल विनोद किलनाके,वनरक्षक विक्रांत दुधे,देवानंद खारडे, ठाकरे,सुनिता तरटे,गेडाम, मेश्राम वनरक्षक यांनी केली.



