Home Maharashtra त्या दोन ठाणेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी विनोद खोब्रागडे यांनी केला न्यायालयात...

त्या दोन ठाणेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी विनोद खोब्रागडे यांनी केला न्यायालयात खटला दाखल… — नोटीस इशु…

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

          चंद्रपूर जिल्ह्यातील दोन ठाणेदार विरुद्ध दोन वेगवेगळ्या न्यायालयात फौजदारी खटला विनोद खोब्रागडे यांनी दाखल केले आहे.या खटल्याला अनुसरून बल्लारपूर न्यायाधीस महोदयांनी नोटीस बजावली आहे.

          भारतीय न्याय संहीता अधिनियम २०२३ चां कलम २३७,२४०,२४८,२५७, कलमानुसार दोन्ही ठाणेदारावर फौजदारी कारवाई साठी विनोद खोब्रागडे यांनी खटला दाखल केला आहे.

           खोटे,बनावट व बोगस “क्राॅस” गुन्हे दाखल करणाऱ्या,व बोगस चार्जशीट दाखल करुन मनस्ताप देणारे दोन ठाणेदारापैकी एख चंद्रपूर येथील आहेत तर बल्लारपूर येथील आहेत.त्यांच्या विरुद्ध विनोद खोब्रागडे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहीता अधिनियम २०२३ चे कलम ३७९ नुसार फौजदारी खटला न्यायालयात दाखल केले आहे.

          सुप्रीम कोर्टाने लालजी मिश्रा विरुद्ध उत्तर प्रदेश व इतर मध्ये नुकतेच जजमेंट दिले आहे की,ठाणेदार यांनी दबावाखाली “क्रास” गुन्हा दाखल केला असेल तर चार्ज शिट न्यायालयात दाखल करताना,दोन्ही गुन्ह्याची माहिती न्यायालयात देने अनिवार्य आहे,वस्तुस्थिती लपवू नये.

           मात्र संबंधित ठाणेदारानी वस्तुस्थिती जाणीवपूर्वक लपवून बोगस अहवाल न्यायालयात दाखल केले व आपल्या कर्तव्यात कसूर केला आहे.

         विनोद खोब्रागडे यांनी बल्लारपूर कोर्टाच्या दिनांक ९/५/२०२५ च्या आदेशानुसार दिनांक १५/५/२०२५ रोजी बादल खुशालराव उराडे व वकिलसह इतर पाच आरोपी विरुद्ध अनेक कलमानुसार गुन्हा दाखल केल्यानंतर दोन महीन्यानंतर दिनांक ७/७/२०२५ रोजी बोगस क्रास गुन्हा बल्लारपूर ठाणेदार यांनी दाखल केला.

             रामनगर पोलिस स्टेशन चंद्रपूर येथे दिनांक १८/६/२०२५ रोजी विनोद खोब्रागडे यांनी दोन वकिल विरुद्ध अट्रासिटीचा कलमानुसार गुन्हा दाखल केल्यानंतर,सहा दिवसांनी बोगस क्रास गुन्हा रामनगर पोलिस निरीक्षक यांनी शेकडो वकिलांचा दबावाखाली दाखल केले.

            सदर संपूर्ण घटनाक्रमाची जाणीवपूर्वक चार्ज शिट न्यायालयात दाखल करताना,उल्लेख केला नाही व विनोद खोब्रागडे वर क्षती पोहचविण्यासाठी खोटे बनावट,अहवाल तयार करून,चार्ज शिट न्यायालयात दाखल केली.

          म्हणून दोन्ही ठाणेदार यांच्या विरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहीता अधिनियम २०२३चा कलम ३७९ नुसार खटला दाखल केला आहे.न्यायालयाने नोटीस इशु केले आहे…

           नुकतेच कोर्ट विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश महोदय चंद्रपूर यांनी,विनोद खोब्रागडे यांच्या आर्गुमेंट नंतर न्यायधिश महोदय चंद्रपूर यांनी बोगस चार रिव्हीजन केसेस बद्दल खुशालराव उराडे व इतर यांनी दाखल केलेल्या केस नंबर २६/२०२५,२७/२०२५, २८/२०२५,व ३३/२०२५ दिनांक ६/२/२०२६ रोजी डिसमीस केले आहे.

           कोर्ट विद्यमान मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब चंद्रपूर यांचा न्यायालयात विनोद खोब्रागडे विरुद्ध असीफ शेख ठाणेदार रामनगर पोलिस स्टेशन चंद्रपूर क्रिमीनल केस नंबर ८३/२०२६ असुन दिनांक १८/२/२०२६ ला सुनावणी आहे.

            तर कोर्ट विद्यमान न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी बल्लारपूर यांचा न्यायालयात विनोद खोब्रागडे विरुद्ध ठाणेदार बल्लारपूर बिपीन इंगळे व इतर दोन क्रिमीनल केस नंबर १३/२०२६ असुन नोटीस इशु झाले असून दिनांक २/३/२०२६ रोजी सुनावणी आहे.

         विशेष म्हणजे,मी माझ्या ३० वर्षाचा नौकरीत एकाही सरकारी रूपयांची अफरातफर केली नाही व तसा डाग नाही,उलट अनेक कंपन्या विरुद्ध कनिष्ठ न्यायालय ते वरिष्ठ न्यायालयात सुप्रीम कोर्टात स्वतःचा खर्चाने जाऊन अवैध कंपन्या बंद केले आहे,शेकडो करोडो रुपये शासनाला मिळवून दिले आहे असे तलाठी विनोद खोब्रागडे यांचे म्हणणे आहे. 

          नुकतेच मौजा कुंसूबीच्या २४ आदीवासीना शेतजमीनीचा व घरांचा मोबदला मी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे जाऊन न्याय व हक्क मिळवून दिला आहे असेही तलाठी विनोद खोब्रागडे यांचे म्हणणे आहे.

       असे असतानाही समाधीत ठाणेदार यांनी बोगस गुन्हे दाखल करुन समाजात,प्रतिष्ठा मलीन केली आहे,व बोगस चार्जशीट क्षती पोहचविण्यासाठी न्यायालयात दाखल केली होती,आणि वस्तुस्थिती जाणीवपूर्वक लपवून ठेवली आहे.म्हणून त्यांनी त्यांचा विरुद्ध फौजदारी खटला न्यायालयात दाखल केले आहे.