Home Vidarbha महिलेची गळफास लावून आत्महत्या..

महिलेची गळफास लावून आत्महत्या..

  कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी.

कन्हान : – 

       जय दुर्गा मंगल कार्यालयाच्या मागे कांद्री येथे राहणाऱ्या महिलेने घराशेजारी असलेल्या प्लाॅट मध्ये गायीच्या गोठ्यात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

           प्राप्त माहिती नुसार रविवार (दि.१०) डिसेंबरला रात्री १० वाजता दरम्यान राजेश शिवप्रसन कश्यप वय ४२ वर्ष रा.कांद्री यांची मृतक पत्नी तुलसीदेवी राजेश कश्यप वय ३८ वर्ष रा.कांद्री हिला जावई सोनु निषाद यांचा फोन आला आणि फोनवर बोलून झोपी गेली.

         सोमवार (दि.११) डिसेंबर सकाळी ७.३० वाजता राजेश झोपेतून उठला,बाथरूम मध्ये गेला आणि परत आला.पण पत्नी घरी कुठेच दिसली नाही.राजेश यांनी पत्नीचा आजुबाजुला शोध घेतला तर घराशेजारी प्लॉट मध्ये गायीच्या गोठ्यात गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसून आल्याने राजेश यांनी वडिलांना बोलावले. 

         वडिलांनी त्याच्या पत्नीला खालून धरले आणि राजेश यांनी दोरी कापून पत्नीला खाली उतरविले.सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना दिली असता पोलीस घटनास्थळी पोहोचले व पंचनामा करुन मृतदेह आपल्या ताब्यात घेतले आणि शवविच्छेदना करिता कामठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

            कन्हान पोलीसांनी राजेश कश्यप यांचा तक्रारी वरून पोस्टेला मर्ग क्र. ५२/२३ कलम १७४ जा.फौ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते यांचा मार्गदर्शनात पो.ना.आशिक कुंभरे हे करित आहे.