कोर्ट स्टे असतांना नवरगांव (गिलगांव) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर फलकाचा वाद निर्माण करणाऱ्या त्या राजकीय लोकांवर कारवाई होणार काय?……. — स्थानिक आमदारांची सखोल चौकशी करण्यात यावी व त्यांचा दंगल घडवून आणण्यास सहभाग असल्यास त्यांच्यावर कारवाई करावी.. — स्थानीक बौद्ध बांधव सामान सोबत घेऊन बैलबंड्यासह गाव सोडण्याच्या तयारीत….. — सर्व प्रकारचे हक्क देणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचाच विरोध करतात,हे तर महाराष्ट्र राज्यातील नागरिकांची शोकांतिकाच?

प्रितम जनबंधु

  संपादक 

गडचिरोली :- चामोर्शी तालुक्यातील नवरगांव (गिलगांव) येथील बौद्ध बांधवानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे फलक ग्रामसभेच्या ठरावा नुसार गावात लावले होते.

        परंतु सदर फलक पोलीस प्रशासनाने काढून टाकले.तेव्हापासुन (तिन महीने) गावात बौद्ध बांधव व संर्वण याच्यामधे फलकावरून वाद निर्माण झालेले सदर प्रकरण सध्या कोर्टात न्यायप्रविष्ट आहे.

        दरम्यान बौद्ध बांधवां डेनी गावठाण जागेवर दुर्गे यांच्या घरासमोर तिन महिण्यापूर्वी पासुनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे फलल लावले होते,तेही संवर्णाना खपले नाही.त्यांनी आमदारांना हाताशी धरून राजकीय शक्तीचा फायदा घेत पुन्हा वाद निर्माण केला असल्याची माहीती प्राप्त झाली आहे. 

           ९ नोव्हेंबरला चामोर्शी कोर्टात तारिख होती.त्यामधे कोर्टाने २७ नोव्हेंबर पर्यंत स्टे दिला आहे. 

          असे असताना संर्वणानी राजकीय लोकांना हातासी धरून पोलीस प्रशासनाला तक्रार केल्यामुळे,दिनांक १० नोव्हेंबरच्या पाहटेला गडचिरोली,चामोर्शी व पोटेगांव पोलीस मोठ्या संख्येने ताफ्यासहीत नवरगावात पाहटेलाच पोहचले.

           गावठाण जागेवर दुर्गे यांचे घरासमोरील फलक प्रशासन उफडून फेकणार असल्याने आम्ही या गावात राहुन काय उपयोग? म्हणुन गावातील संपुर्ण बौद्ध बांधव आपापल्या बैल-बंड्यावर सामान मांडून गाव सोडण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.

          सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असतांना कुणीही हस्तक्षेप करू नये,कोर्टाचा स्टे असतांना पोलीस प्रशासन राजकीय दबावात येवून सदरची कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.मात्र गावकरी बैल-बंड्यावर सामान टाकून व ग्रामपंचायत कमेटीचा निषेध करीत,प्रशासन मुर्दाबाद असे फलक बैलगाडीला बांधुन ऐन दिवाळीच्या दिवशी बौद्ध बांधव गांव सोडून जात आहेत. 

               सदर गंभीर बाब म्हणजे एकप्रकारची दुदैवी घटना बघता जिल्हाधिकारी गडचिरोली व प्रशासनांनी सदर बाबीकडे प्रामुख्याने लक्ष घालुन प्रतीबंधात्मक उपाययोजना करुन योग्य ती कारवाई सदर व्यक्तींवर करुन बौद्ध बांधवाना योग्य न्याय मिळवून द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी गडचिराेली जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

          स्थानिक आमदार राजकीय शक्तीचा वापर करून नवरगाव (गिलगांव) येथील बौद्ध बांधवांना नाहक त्रास देऊन अळचणीत आणण्यास गावगुंड लोकांना मदत करीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.म्हणूनच स्थानिक आमदारांची विविध प्रकारे चौकशी होणे गरजेचे झाले आहे.

          स्थानिक आमदार हे खरोखरच जातीयतेढ निर्माण करुन गावातील शांतता भंग करीत असतील तर त्यांच्यावर प्रथमतः विविध कलमान्वये कारवाई होणे आवश्यक आहे.

              याचबरोबर ग्रामपंचायत अंतर्गत घेतलेल्या ग्रामसभेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा फलक लावण्याचा ठराव पारीत झाल्यानंतर वाद निर्माण करणारे ते जातियवादी गावगुंड कोण आहेत याचा शोध पोलीस अधिकाऱ्यांनी वेळ न दवडता घेतला पाहिजे व त्यांच्यावर वेळेतच कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असेच नवरगांव येथील प्रकरण सांगून जाते आहे.

             तद्वतच भयभीत झालेल्या बौध्द बांधवांना महाराष्ट्र शासनाने व पोलीस प्रशासनाने संरक्षण देणे आवश्यक असल्याचे तेथील गंभीर घटनाक्रमावरुन दिसून येते.