Home उपक्रम नगरपंचायत प्रशासन पोहचले जनतेच्या दारी… — पारशिवनीतील जनतेचा आवाज पोहचला प्रशासनापर्यंत…

नगरपंचायत प्रशासन पोहचले जनतेच्या दारी… — पारशिवनीतील जनतेचा आवाज पोहचला प्रशासनापर्यंत…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

 पारशिवनी :- पारशिवनी नगर पंचायती च्या वतीने पारशिवनी शहरातील प्रभाग क्रमांक १ ते १७ मध्ये आठवड्यातील प्रत्येक बुधवारी परिसरात नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे लशी माहिती नगर पंचायतचे प्रशासक नितिन लुंगे यांनी दिली आले.

       नागरिकांनी परिसरातील समस्या प्रशासनासमोर मांडताच अडचणींवर तात्काळ उपाययोजना केल्या गेल्या. उर्वरित समस्या सोडविण्यास संबंधित विभागांना प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देण्यात आले.

        या समाधान शिबिरात नगर पंचायतचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री.नितीन लुंगे यांनी शेकडो नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. रस्ते, गटार, वीज, कचरा व्यवस्थापन, स्ट्रीट लाइट, आरोग्यसेवा आदी बाबतीत आलेल्या तक्रारींवर तात्काळ कृती करण्याचे आदेश सुद्धा दिले. काही समस्या ज्या दीर्घकालीन योजनांशी संबंधित होत्या, त्यावर विकास आराखडे तयार करण्याची प्रकिया सुरू करण्यात आली.

          या प्रभाग क्रमांक १७ मध्ये झालेले समाधान शिबिरात प्रशासकीय अधिकारी निखिल ढोले, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी भाग्यश्री देवरे(बाविस्कर) रचना सहायक सीमा सरवदे, स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता सुरज पिंपळकर, लेखापाल जावेद तडवी, लेखा परीक्षक सुमेध बनकर, स्वच्छता निरीक्षक निलेश नकाशे, शहर स्तरीय तांत्रिक तज्ञ शुभम लिंगायत, शहर समन्वयक अनुप पोहुरकर, तसे इतर अधिकारी व कर्मचारी समाधान शिबीरात उपस्थित होते.

          नगर पंचायतच्या स्थापने पासून पारशिवनी परिसरातील प्रत्येक प्रभागात विकासकामां मुळे बदल घडून आला आहे. काही ठिकाणी समस्या कायम असल्यातरी त्या लवकरच सोडवण्यात येतील, अशी ग्वाही नगर पंचायतचे प्रशासक तथा मुख्याधिकारी नितीन लुंगे यांनी दिली. या उपक्रमामुळे नागरिक व प्रशासन यांच्यात थेट संवाद साधला गेला.