Home देशविदेश आता डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताच्या संविधान रक्षणाची जबाबदारी आमची आम्ही भारताचे लोक……...

आता डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताच्या संविधान रक्षणाची जबाबदारी आमची आम्ही भारताचे लोक…… — ना राष्ट्रपतीची, ना प्रधानमंत्र्याची, ना CJI ची, ना निवडणूक आयोगाची, ना ही संसदेची…… — ना कोणत्या विधानमंडळाची ना ही कोण्या मुख्यमंत्र्याची….  — लेखाचा पुरवार्ध….

 केवळ आणि केवळ आमचीच( भारतीय जनतेची)……

             कारण……..

मा.राष्ट्रपती,

        आपण देशाचे प्रथम नागरिक आणि पूर्वाश्रमीच्या आदिवासी जमातीच्या असून सुद्धा, आपण मात्र RSS / मोहन भागवत / मोदी / शहा अर्थात भाजपाच्या तालमीतून आल्यामुळे का काय……..

        गेल्या 750 दिवसापासून जळत्या आदिवासी मणिपूरला विझवीण्यासाठी थांबविण्यासाठी कोणताही आदेश दिलेला नाही. तेंव्हा दोन आदिवासी महिलांची नग्न धिंड जमाव काढतो आणि अत्याचार करतो. यामुळे जगात भारताची नाचक्की होते. आणि तुम्ही सर्व प्रकारचे आदेश देण्याचे अधिकार असताना तुम्ही केवळ मौन धारण करून का बसलात….?

         ज्या नवीन संसदेचे (सेंट्रल व्हिस्टाचे) उदघाटन करताना तुम्हाला निमंत्रण नव्हते, तर तुम्ही तिथे नंतर कधीच पाय ठेवायचा नसता…….!

          याचा अर्थ स्पष्ट आहे की तुम्ही आम्हाला व आमच्या देशाला स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या लोकशाही मूल्यांना मिळवून देणे तर सोडाच केवळ संरक्षण सुद्धा तुम्ही आमचे या मनुवाद्यापासून करू शकत नाही, हे स्पष्ट झाल्यामुळेच आता आम्हीच आमचे संरक्षक म्हणून आम्ही प्रत्येक भारतीय जबाबदार नागरिक बनू ते ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताच्या संविधान निर्मितीतून जागृत होऊन.

        मा.प्रधानमंत्री मोदीजी तुमच्यात थोडीजरी नैतिकता शिल्लक असेल तर ताबडतोब या पदाचा राजीनामा द्या.

       कारण तुम्ही तर अदानी, अंबानीच्या कुशीत जाऊन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड करण्याचे ध्येय उराशी बाळगूनच आलात की काय आता शंका येत आहे. गेल्या 11 वर्षात एक महिना ( 30 दिवस लगातार) असा गेला नाही की तुम्ही कोणत्यातरी देशात जाऊन तेथील भारतीय वंशाच्या टाळ्या मिळवल्या नाहीत…..!

    मला वाटते एकही देश उरला नसेल की तुम्ही तिथे गेला नाहीत. परंतू ऑपरेशन सिंदूरसाठी एकही बलाढ्य देश आमच्या बाजूने उभा राहिला नाही. उलट पाकिस्तानला युनोच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद बहाल करण्यासाठी 182 देशांनी समर्थन दिले. ज्या इंदिरा गांधी यांनी त्यांच्या काळात अमेरिकेला सुद्धा भारताच्या सार्वभौमत्वाची शक्ती 1971 मध्ये दाखवली. ती शक्ती तुम्ही पूर्ण नेभळत आणि षंढ बनून अमेरिकेकडे सीझफायरचे श्रेय सोपवून भारताचे सार्वभौमत्व संपवून टाकले.

        म्हणून तुम्ही आजपर्यंत ज्या EVM च्या बळावर तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेत बसलात. तुमची 2019 नंतर एका दिवसाची सुद्धा लायकी राहिली नाही. पण तुम्ही निर्लज्ज असल्यामुळे आणि आमच्या भारतीय सर्वसामान्य जनतेत सहनशिलता अमर्याद असल्यामुळे आणि विशेष म्हणजे विरोधी पक्षात सुद्धा नीतिमत्ता नसल्याचा लाभ आपण उठवत असुरी आनंद आहात.

         म्हणून आता तुमची गरज आम्हाला राहिलेली नाही. आता आम्ही संविधानातून जागृत होऊन तुम्हाला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही.

       कारण आम्ही भारताचे लोक आणि स्वतःप्रत अधिनियमित करून अंगीकृत करण्याची आम्ही शपथ घेतलेली आहे. म्हणून….

     या लेखाचा उत्तरार्ध भाग उद्याच्या भागात….

   आवाहनकर्ता :- अनंत केरबाजी भवरे 

संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689