टायगर ग्रुप चिमूर शहराध्यक्षांचा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा…

     रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी 

          चिमूर शहराध्यक्ष रोहन उर्फ (बाबा) भाऊ नन्नावरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्य वंदना आधार फाउंडेशन द्वारा संचालित टायगर ग्रुपच्या माध्यमातून वृक्षारोपणान्वये साजरा करण्यात आला.

     रोडवरील बेगर,बेवारस,भिक्षेकरी,निराधार,अनाथ,मनोरुग्ण,पुनर्वसन केंद्र व वृद्धाश्रम इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

        टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव,टायगर ग्रुप वर्धा जिल्हा सदस्य सुनील भाऊ मंगरूळकर,टायगर ग्रुप वरोरा तालुकाध्यक्ष ऋषभ रट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली व टायगर ग्रुप चिमूर उपाध्यक्ष विकास जांभुडे,कार्याध्यक्ष विशाल शेंडे यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.

        प्रमुख उपस्थिती दिव्य वंदना आधार फाउंडेशन अध्यक्ष शुभम दादा पसारकर,शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते,उपस्थित सदस्य विशाल शिवरकर,पवन डोंगरवार,निखिल गिरी,सौरभ चटपकार,प्रफुल मते, कुणाल खिरटकर,शुभम जांभुर्डे स्वप्निल मसराम व इतर पदाधिकारी उपस्थित होते.